Kasaba By-Election: कसबा पोटनिवडणुकी साठी भाजपचा उमेदवार जाहीर? चंद्रकांत पाटील म्हणाले...

BJP Candidate For Kasaba By- Election: कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारीबाबत संपुर्ण शहरात चर्चा सुरु आहे.
Kasaba By-Election | Chandrakant Patil
Kasaba By-Election | Chandrakant Patil Sarkarnama
Published on
Updated on

Kasaba By-Election News : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारीबाबत संपुर्ण शहरात चर्चा सुरु आहे. अनेक इच्छुकांची नावे समोर येत असताना आज (३ फेब्रुवारी) भाजपचे नेते व राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भाजप-शिंदे गटात महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीनंतर कसबा विधानसभेसाठी काही नावे समोर आली आहे.

कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार निश्चित झाल्याचीही माहिती आहे. सुरुवातीला दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या घरातील व्यक्तीला उमेदवारी देण्याबाबच चर्चा सुरु होती. पण आता टिळक कुटुंबातील नव्हे तर दुसऱ्या नेत्याला भाजप उमेदवारी देण्यात आल्याची माहिती आहे. हेमंत रासने यांचे नाव भाजपकडून निश्चित होऊ शकते, अशी शक्यता आहे. पण अधिकृत उमेदवाराच्या नावाची घोषणा संध्याकाळी दिल्लीतून होणार असल्याची माहिती आहे.

Kasaba By-Election | Chandrakant Patil
Chinchwad By-Election : चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने लढायचं ठरवलंच, तर दहामधून एकाला उमेदवारी देण्यात अजित पवारांची कसोटी लागणार

दरम्यान, यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'अजूनही नाव कोणाचे ही नाव निश्चित झालेले नाही, नावांची shortlist तयार होत आहे. यादी तयार झाल्यानंतर ती वरिष्ठांकडे पाठवली जाईल. ६ तारखेला अर्ज भरण्यासाठी वेळ ठरली आहे. सकाळी ११ वाजता कसबा आणि १ वाजता चिंचवड साठी उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आहे. पक्षाची जबाबदारी आणि निवडणुका वेगळ्या गोष्टी आहेत. संघटनात्मक जबाबदारी दिली म्हणून ते निवडणूक प्रक्रियेतून बाहेर पडले असे होत नाही. माधुरी मिसाळ यांनी सर्व पक्षांना विनंती पत्र दिले आहेत जेणे करून ही निवडणूक बिनविरोध होईल. राज्यस्तरीय नेत्यांशी आमचे लोकं बोलत आहेत. ५० टक्के वाटतं की निवडणूक बिनविरोध होईल, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

याचवेळी त्यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवरही निशाणा साधला आहे. घर फोडण्याची परंपरा काँग्रेस आणि राष्ट्रवादी ची आहे. सत्तेचा दुरुपयोग आणि विश्वास घात कोणी केला, २०१९ मध्ये तुम्ही गद्दारीच केली ना. पाठीत कोणी खंजीर खुपसली याच्यावर एक वेगळी परिषद घ्यायला हवी, असा टोलाही पाटील यांनी लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com