Lok Sabha Election 2024 : उपराजधानीत आता नमो युवा महासंमेलनातून तरुणाईत जागृती

Chandrashekhar Bawankule : भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितला दहा वर्षातील युवा वर्गाचा ‘रोडमॅप’. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्याचा तपशिलही केला जाहीर
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वी नागपूर शहरात नमो युवा महासंमेलन होणार आहे. सोमवारी (ता. चार) उपराजधानीत होणाऱ्या या महासंमेलनात एक लाख युवा सहभागी होणार आहेत. आगामी दहा वर्षात देशातील युवा कोणत्या मार्गावर असला पाहिजे, याचा रोडमॅप या महासंमेलनात ठरणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 40 पेक्षा जास्त युवा कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या आहेत. या सर्व योजनांची माहिती या महासंमेलनात देण्यात येणार आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले. देशात लवकरच लोकसभा निवडणूक होणार आहे. देशातील निर्णायक घटक युवा मतदार आहेत. त्यामुळ त्यांचा विचार करूनच जाहीरनामा तयार करण्यात येत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री तथा भाजपचे नेते अमित शाह या महासंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता. पाच) अकोल्यात पश्चिम विदर्भातील आढावा बैठक घेणार आहेत. याच दिवशी सकाळी शाह हे जळगावातही आणि त्यानंतर सायंकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा घेणार आहेत. अकोल्यातील बैठकीत अकोला, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ या लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा होणार आहे. भाजपच्यावतीने घराघरात जात दहा लाख बॉक्सेसचे वितरण करण्यात येत आहे. या बॉक्सेसमधून येणाऱ्या सूचना केंद सरकारला पाठविण्यात येणार आहेत. त्यामुळे लोकांना नेमके काय हवे, काय नको ते कळणार आहे. बुधवारी (ता. सहा) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संपूर्ण महिलांशी संवाद साधणार आहेत. नारीशक्ती वंदना कार्यक्रमाला ते संबोधित करतील, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : लहान पक्षातील कार्यकर्त्यांचे सहकार्य घेण्याबाबत बोललो

पंतप्रधान नरेंद्र मोदी 288 मतदारसंघात ऑनलाइन पद्धतीने हा कार्यक्रम घेणार आहेत. प्रत्येक मतदारसंघातून पाच हजार महिला या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. भाजपचे कार्यकर्ते घरोघरी जात प्रत्येकापर्यंत मोदीजींचा नमस्कार पोहोचविणार आहेत. दहा लाख संकल्पपत्र योजनेतून वाटप करण्यात येणार आहे. त्यानुसार जाहीरनामा तयार करताना जनतेच्या भावनांचा विचार केला जाणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांनी शनिवारी (ता. दोन) नागपुरात बोलताना दिली. रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, यासंदर्भात प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देतील. कदम यांचे मत हे महायुतीचे मत नाही. यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे हे स्पष्ट भूमिका मांडतील. महाविकास आघाडीने घटक पक्षांना संपविण्याचे काम केले आहे. महायुतीमध्ये मात्र सर्वच पक्षांना सामावून घेतले जात आहे. महायुतीमध्ये सगळ्यांना सांभाळून घेत विकास करण्यात येत असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. यावरून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. गडकरी यांनी याबाबत कायदेशीर नोटीस पाठविली आहे. गडकरींनी सातत्याने जनकल्याणाचे काम केले आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही ते भरघोस मतांनी विजयी होतील, यात शंकाच नसल्याचे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. उद्धव ठाकरे यांची परिस्थिती राजकारणात आता ‘हम दो, हमारे दो’ अशी होणार आहे. मुख्यमंत्री असताना ते दोनदाच विधिमंडळात आले होते. आता ते विधिमंडळात आले तर त्यांना काय काम केले हे लोक विचारतील म्हणून ते अधिवेशनही टाळतात असा टोला बावनकुळे यांनी लगावला.

Edited By : Prasannaa Jakate

Chandrashekhar Bawankule
Bawankule On Congress : बावनकुळे म्हणतात, 'काँग्रेस भ्रष्टाचारी पण मोदींवर दहा वर्षांत एकही डाग...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com