Chandrashekhar Bawankule : लहान पक्षातील कार्यकर्त्यांचे सहकार्य घेण्याबाबत बोललो

Small Political Parties : लहान पक्षांना संपविण्याबाबत विधान केलेच नाही
Chandrashekhar Bawankule.
Chandrashekhar Bawankule.Sarkarnama
Published on
Updated on

Chandrashekhar Bawankule : भाजपचा सातत्याने विस्तार होत आहे. विकसित भारताचा संकल्प नरेंद्र मोदींनी केला आहे. या संकल्पाला साथ देण्यासाठी पक्षप्रवेश होत आहेत. प्रत्येक बुथवर प्रत्येक, मतदान केंद्रावर छोटेछोटे कार्यकर्ते मोदींच्या संकल्पला साथ देण्यासाठी भाजपमध्ये यायला तयार आहे. महायुतीत छोटे पक्ष आहेत. त्यांचे सहकार्य घ्या. त्यांना सोबत घ्या. जे भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत, अशांना सोबत घेण्याबद्दल आपण बोललो होतो असा खुलासा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

भाजपपुढे असलेल्या लहान पक्षांना संपवून टाका, अशी भाषा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्याची टीका होत आहे. यासंदर्भात बोलताना बावनकुळे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. अनेक लोकांचे मेसेज येतात. त्यांना पक्षात यायचे आहे. भाजपमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत आहे. ज्यांना यायची इच्छा असेल, त्यांचे आम्ही स्वागत करू. आपण कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की, कोणीही आल्यामुळे कोणाच्याही पदाला कोणताही धक्का लागणार नाही. सर्वांना आश्वास्त करण्यात आल्याचे बावनकुळे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chandrashekhar Bawankule.
Bawankule On Congress : बावनकुळे म्हणतात, 'काँग्रेस भ्रष्टाचारी पण मोदींवर दहा वर्षांत एकही डाग...'

छोट्या पक्षांबाबत जे वाक्य आपल्या तोंडी घालण्यात आले आहे, ते चुकीचे आहे. चुकीचे वृत्त पसरविण्यात येत आहे. यासंदर्भात विरोधकांची प्रतिक्रिया घेऊन प्रतिमा खराब करण्याचे काम केले जात आहे. असा प्रकार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे बावनकुळे म्हणाले. नरेंद्र मोदींना बहुमत असूनही ते सर्व घटक पक्षांना सामावून घेत आहेत. 2014 ते 2019 मध्ये अनेक छोट्या पक्षांना सामावून घेत त्यांना नरेंद्र मोदी यांनी मोठे स्थान दिले आहे. असे असताना आपण छोट्या पक्षांबाबत कोणतेही विधान करून शकत नाही, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

महाराष्ट्रात महादेव जानकर मंत्री झालेत. त्यातून भारतीय जनता पार्टी छोट्या पक्षाला सांभाळणारी पार्टी आहे, हे सिद्ध होते. भाजपमध्ये छोट्या पक्षांना सन्मान आहे. भारतीय जनता पार्टीची उंची वाढविणे ही जबाबदारी आहे. पक्षामध्ये खूप ‘स्पेस’ आहे. मोदींच्या ‘गॅरंटी’ला सर्वच पक्ष मान्य करतील, असेही ते म्हणाले. जेव्हा विकासावर बोलता येत नाही तेव्हा दररोज सकाळी काही लोक टीव्हीवर येतात. अशी मंडळी काही विकासावर बोलत नाही. सत्तेमध्ये असताना त्यांनी कधी विकास केला नाही. मागील 65 वर्षात काँग्रेस सरकार होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार दहा वर्षाचे आहे. कोणी काय केले, हे जनतेला माहिती असल्याचे बावनकुळे म्हणाले. विरोधकांना जनतेमध्ये येऊ द्या. त्यानंतर त्यांना ‘डालआट्या’चा भाव कळेल. भाजपने भ्रष्टाचारावर ‘व्हाइटपेपर’ काढला आहे. विरोधकांना खुले आव्हान दिले आहे. बोलायचे असेल तर विकासावर बोला असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule.
Bawankule News : स्वातंत्र्यवीरांच्या गावातून बावनकुळे गरजले; म्हणाले, एवढी ‘त्यांची’ उंची नाही !

महाविकास आघाडीमध्ये जेवढा बच्चू कडू यांना मानसन्मान होता, त्यापेक्षा जास्त मानसन्मान महायुतीच्या सरकारमध्ये त्यांना मिळालेला आहे. आपल्याला अभिमान आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बच्चू कडूंनी जे काम दिले. ते कडू प्रभावीपणे सांभाळत आहेत. महाविकास आघाडीपेक्षा महायुतीने बच्चू कडू यांना अधिक चांगली वागणूक दिली आहे. महादेव जानकर यांनाही विनंती आहे की, भारतीय जनता पार्टीवर टीका करू नये. जानकर देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये स्वतः मंत्री होते. प्रत्येकवेळी छोट्या पक्षांना पूर्ण ताकतीने सांभाळण्याचे काम भाजपने केले आहे. उलट शरद पवार आणि काँग्रेसच्या काळात अनेक लहान पक्षांना संपविण्याचे काम झाल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

Edited By : Prasannaa Jakate

Chandrashekhar Bawankule.
Chandrashekhar Bawankule : राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांच्या बाजूने, बावनकुळे बघा काय म्हणाले ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com