BJP vs Congress News : भाजपकडून पुन्हा 'हनुमान चालिसा' अस्त्र, दर्शन कॉलनीत वातावरण तापले !

BJP : भाजप आणि काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते आपसात भिडले आहे.
Mahavikas Aghadiand BJP
Mahavikas Aghadiand BJPSarkarnama

Nagpur Darshan Colony News : दर्शन कॉलनीत होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेला विरोध करण्यासाठी मैदान बचाव समितीच्यावतीने आज सकाळी ११ वाजतापासून हनुमान चालिसा पठण केले जाणार आहे. या माध्यमातून येथील सभा रद्द करावी, अशी मागणी केली जाणार आहे. (The atmosphere has heated up well from the Vajramooth meeting of the Mahavikas Aghadi)

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि अमरावती जिल्‍ह्यातील बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात हनुमान चालीसाचे अस्त्र उगारले होते. त्यावेळी त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला आहे. आता नागपुरात महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवरून वातावरण चांगलेच तापले आहे. याही वेळी आमदार कृष्णा खोपडे व माजी नगरसेवक हरीष दिकोंडवार यांना पुढे करून भाजपने हनुमान चालिसा अस्‍त्र उगारले आहे.

महाविकास आघाडीने १६ एप्रिलला दर्शन कॉलनीतील मैदानावर वज्रमूठ सभेची घोषणा केली आहे. तेव्हापासून भाजप आणि काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते आपसात भिडले आहे. हे पटांगण आहे. येथे खेळाडू रोज सराव करतात. अलीकडेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हे पटांगण खेळासाठी विकसित केले आहे. सभेमुळे मैदान खराब होणार असल्याचे सांगून भाजपचे कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिकांनी यास विरोध दर्शवला आहे.

याकरिता मैदान बचाव समिती स्थापन करण्यात आली आहे. या सभेला नागपूर (Nagpur) सुधार प्रन्यासने दिलेली परवानगी रद्द करावी, अशी मागणीही आमदार कृष्णा खोपडे आणि माजी नगरसेवक हरीश दिकोंडवार यांनी केली आहे. आघाडीच्या सभेची धास्ती घेतल्याने पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे खेळाडूंना समोर करून विरोध करीत असल्याचे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

Mahavikas Aghadiand BJP
Nagpur MNS News : आयुक्त तुम्ही पाकिस्तानचे आहात का? पाण्यासाठी मनसे आक्रमक !

मैदान बचाव समितीत भाजपच्याच (BJP) कार्यकर्त्यांचा समावेश आहे. कुठल्याच नागरिकांचा विरोध नाही. या मैदानावर यापूर्वी सामूहिक विवाहाचे कार्यक्रम झाले आहेत. तेव्हा कुठल्याच भाजपच्या नेत्यांनी विरोध केला नाही. आत्ताच त्यांना मैदान खराब होईल, हे कसे उमगले असे काँग्रेसच्या (Congress) नेत्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, आजपासून सुरू होत असलेल्या हनुमान चालिसा पठण आंदोलनात खेळाडू आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन आमदार खोपडे यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com