OBC News : ओबीसींना आकर्षित करण्यासाठी भाजपचा 'मेगा प्लॅन' : फडणवीस, बावनकुळे मैदानात

Devendra Fadnavis News : यात्रा पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातील अकराही जिल्हे पादाक्रांत करेल.
Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule News
Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule NewsSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारला झुकायला भाग पाडलेल्या ओबीसी समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने नवी व्यूहरचना केली आहे. त्यानुसार गांधी जयंती पासून संपूर्ण महाराष्ट्रात भ्रमण करणाऱ्या 'ओबीसी जागर' यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप (BJP) ओबीसी मोर्चाचे प्रदेश प्रभारी माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या पुढाकारातून ही यात्रा काढण्यात येणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्र भ्रमण करणाऱ्या भाजपच्या ओबीसी (OBC) जागर यात्रेचा शुभारंभ २ ऑक्टोबर २०२३, गांधी जयंतीच्या दिवशी करण्यात येणार आहे. बापुकुटी, सेवाग्राम येथे सकाळी ९.०० वाजता नतमस्तक होऊन भाजपचे नेते यात्रेला सुरुवात करणार आहे. त्यानंतर हिंगणघाटच्या पारडी गावाजवळ ओबीसी समाजाच्या सर्व घटकांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) तसेच राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, महाराष्ट्रातील मंत्री, खासदार, आमदार आणि नेते मोठ्या प्रमाणात सहभागी होतील.

Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule News
Rahul Gandhi News : राहुल गांधींनी भाजपला घेरले : ओबीसी जनगणनेच्या मुद्द्यावरून हल्लाबोल

यात्रा पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातील अकराही जिल्हे पादाक्रांत करेल. पहिल्या टप्प्याचा समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या प्रमुख उपस्थितीत वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे होणार आहे. ओबीसी जागर यात्रा यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, रामटेक, काटोल, अकोला, शेगाव, वाशीम येथून जाणार आहे. नवरात्रानंतर उत्तर महाराष्ट्रात ही यात्रा सुरू राहील. भाजप सत्तेत असून राज्य सरकारने ओबीसी समाजाच्या हितासाठी ज्या योजना राबविल्यात आणि जे कार्य केले, त्याबद्दल ओबीसी समाजाला माहिती मिळावी, हा या ओबीसी जागर यात्रेचा प्रमुख उद्देश आहे, असे देशमुख यांनी सांगितले.

दोन यात्रांचा धुरळा

विदर्भात गांधी जयंती पासून दोन राजकीय पक्ष यात्रा निघणार आहेत. आम आदमी पार्टीने (AAP) यापूर्वीच आपल्या झाडू यात्रेची घोषणा केली आहे. संपूर्ण विदर्भात ही यात्रा प्रवास करणार आहे. त्या पाठोपाठ आता भाजपनेही ओबीसी जागर यात्रेची घोषणा केल्याने संपूर्ण विदर्भात दोन राजकीय यात्रांचा धुरळा उडणार आहे. या यात्रांसाठी दोन्ही पक्षातील पदाधिकारी नेते व कार्यकर्ते कंबर कसून कामाला लागले आहेत. यात्रा यशस्वी झालीच पाहिजे, यावर आम आदमी पार्टी व भाजप दोन्हीचाही जोर आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule News
Daund Bazar Samiti : झाकून चाललेले काम यापुढे खुलेपणाने करणार; राहुल कुलांचे थोरातांच्या काळातील कामकाजावर बोट

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com