BJPचे नामांकन आणि शक्तिप्रदर्शन; फडणवीस, बावनकुळे साधणार पदवीधरांशी संवाद !

Amravati : भाजप जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असून त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
Devendra Fadanvis, Ranjeet Patil and Chandrashekhar Bawankule.
Devendra Fadanvis, Ranjeet Patil and Chandrashekhar Bawankule.Sarkarnama
Published on
Updated on

Amravati Division Graduate Constituency Election : अमरावती (Amravati) विभाग पदवीधर मतदार संघातून भाजपचा उमेदवार आधीपासूनच ठरलेला आहे. सलग दोन टर्म या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे डॉ. रणजीत पाटील यावेळी पुन्हा भाजपकडून लढत आहेत. भाजप उद्या पाटील यांचे नामांकन दाखल करणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित राहणार आहेत.

उद्या भाजप (BJP) शक्तिप्रदर्शन करणार आहे. नामांकन दाखल करतानाच येथील दसरा मैदान येथे पदवीधर संवाद संमेलन आयोजित करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanis) व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यावेळी पदवीधरांसोबत संवाद साधणार आहेत. यावेळी भाजप जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असून त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. संमेलनात पदवीधरांची संख्या अधिक राहावी, यासाठी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी भाजपची टीम कामाला लागली आहे.

सलग १२ वर्षे हा मतदारसंघ आपल्या राखणाऱ्या भाजपमध्ये पुन्हा विजय मिळवण्याची जिद्द पेटली आहे. असे असताना महाविकास आघाडीकडून त्यांना अद्याप आव्हान दिले गेले नाही. महाविकास आघाडीचे उमेदवाराबाबत अद्याप काहीच ठरलेले नाही. ठरले असेलही, तरी घोषणा अद्याप झालेली नाही. राज्यात पाच ठिकाणी होत असलेल्या विधान परिषदेच्या नाशिक, कोकण व औरंगाबाद येथील निर्णय झाले असताना अमरावती व नागपूर येथील निर्णय मात्र अधांतरी आहे.

कॉंग्रेसही ताकदीने भिडली..

अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाचही जिल्ह्यात मतदार नोंदणी मोहीम राबविली. पूर्वी नुटाला समर्थन देत काँग्रेस या मतदारसंघावर वर्चस्व ठेवत आला असला तरी २०१२ पासून हा मतदारसंघ त्यांच्या हातून गेला आहे. तो पुन्हा मिळवण्याचे प्रयत्न यावेळी करण्याचा चंग स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बांधला असला तरी उमेदवार निश्चित होण्यास विलंब होत असल्याने अस्वस्थता वाढली आहे. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसच्या कोट्यात असताना शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटातून प्रयत्न सुरू झाल्याने अंतर्गत आव्हानाचा सामना करण्याची वेळ प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आली आहे.

Devendra Fadanvis, Ranjeet Patil and Chandrashekhar Bawankule.
पदवीधर निवडणूक; काँग्रेसच्या मार्गात `टीडीएफ`चा गतीरोधक?

काँग्रेसकडून अकोल्याचे डॉ. सुधीर ढोणे यांनी जोरदार दावा केला असला तरी आघाडीचे या मतदारसंघाचे समन्वयक माजी महापौर मिलिंद चिमोटे यांचेही नाव चर्चेत आघाडीवर आहे. दरम्यान, नाना पटोले काय निर्णय देतात, याकडे काँग्रेस व महाविकास आघाडीसोबतच भाजपचेही लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com