नाशिक: एनडीएसटी सोसायटीच्या (Teachers society) निवडणुकीत टीडीएफ (TDF Organisation) संघटनेच्या प्रगती पॅनलचे २१ पैकी २० संचालक निवडून येणे म्हणजे संचालक मंडळाने केलेल्या कामाची पावती सभासदांनी दिली आहे. संघटनेत आपल्या विचाराशी सहमत, समय सुचकता असलेली व समस्या सोडणारी माणसं आहेत. टीडीएफ संघटनेचे काम एनडीएसटी सोसायटीच्या निवडणूक पर्यंत मर्यादित न ठेवता, पदवीधर शिक्षक (Graduate constituebcy) आमदार निवडून आणण्याची तयारी सुरु करा, टीडीएफचा पदवीधर शिक्षक आमदार विधान सभेत पाठविण्यासाठी कामाला लागा असे आवाहन संस्थापक अध्यक्ष माजी आमदार जे. पी. गावीत (J. P. Gavit) यांनी काढले. (CPM leader J. P. Gavit given sign to fight graduate constituency election)
आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळा सुरु होण्यापूर्वी सहामाही पूर्वतयारी आढावा बैठक व एनडीएसटीच्या नवनिर्वाचित संचालकांच्या सत्कार समारंभात मार्गदर्शन करताना बोलत होते.
श्री. गावीत म्हणाले की, सोसायटीच्या सभासदाला कर्ज घेण्याची व सोसायटीला कर्ज देण्याची वेळच येता कामा नये. नवीन उपक्रमातून व्याजाने पैसे देण्याचे काम थांबले तर सभासदांची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. अडचण असेल तरच सभासदांनी कर्ज घेतले पाहिजे. काही सभासद कर्जाची परतफेड करीत नाही, त्यांनी घेतलेल्या कर्जाचे हप्ते कपात होणे थांबतात. जामीनदार असलेल्या आपल्या सहकार्याच्या पगारातून दुसऱ्याने घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यांची कपात कर्ज न घेणाऱ्या सभासदांच्या पगारातून सुरु होते. कर्ज बुडविणाऱ्या सभासदांची खात्री करूनच सोसायटीनेही कर्ज मंजूर केले पाहिजे.
टीडीएफ प्रगती पॅनेल प्रमुख व संचालक मोहन चकोर म्हणाले, की सुरगाणा सारख्या दऱ्या-खोऱ्यांमधील आदिवासी बांधव आणि त्यांच्यासाठी शिक्षणाची व जीवनावश्यक गोष्टींची व्यवस्था करण्यासाठी आपली शिक्षण संस्था नवनवीन उपक्रम राबवीत असते. शाळा सुरु होण्यापूर्वी मिटींग घेऊन शैक्षणिक कामकाजाची पूर्व तयारी करणारी आपली एकमेव आदर्श संस्था आहे. एनडीएसटी सोसायटी मार्फत सभासदांच्या पाल्यांसाठी कन्यादान योजना सुरु केली आहे. सर्व सभासदांना वेळेवर जास्तीत- जास्त कर्ज देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.
यावेळी प्रारंभी प्रगती पॅनेलच्यावतीने अलंगुण ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच व संस्थेचे संचालक हिरामण गावीत, छोटू शिरसाट, शांताराम देवरे, निंबा कापडणीस, अशोक बागुल, सचिन पगार, चंद्रशेखर सावंत, विलास जाधव, अनिल देवरे, कवी ना. सो. कुवर, परशराम चौधरी, पांडूरंग भोये, ए. जे. बागुल, के. एच राऊत, आर.एच.गांगुर्डे, ऊर्मिला गावीत, बी.के.जाधव, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.