BJYM Agitation : विद्यापीठातील भाजयुमोच्या आंदोलनाला सदस्यांची मूकसंमती?

Nagpur University : विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच अशाप्रकारे बैठक उधळण्यात आल्याचे दिसले.
BJYM Agitation
BJYM Agitation
Published on
Updated on

BJYM Agitation : भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी आज (ता. 8) विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक उधळून लावली. त्यासाठी विद्यापीठाच्या सर्वच सदस्यांची मूकसंमती असल्याचे दिसून आले. यामध्ये राज्यपाल प्रतिनिधी समय बनसोड, वामन तुर्के, अजय चव्हाण, योगेश भुते, अधिष्ठाता यांनीही जवळपास आंदोलकांचे समर्थन करण्याची भूमिका घेतल्याचे बघायला मिळाले.

विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच अशाप्रकारे बैठक उधळण्यात आल्याचे दिसले. विशेष म्हणजे, प्रशासनाकडून त्यांना चहाची व्यवस्था करून देण्यात आली. कुलगुरूंकडूनही अशा व्यवहाराबाबत मौन बाळगण्यात आले. त्यामुळे आज भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी केलेला प्रकार नियोजित होता की काय, अशी चर्चा विद्यापीठ परिसरात सुरू आहे.

BJYM Agitation
Nagpur Double Murder : डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पदभार स्वीकारला, अन् काही तासांतच ‘डबल मर्डर’ची सलामी !

राज्याचे माजी ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत यांचे चिरंजीव कुणाल राऊत यांनी १ फेब्रुवारी रोजी विद्यापीठ परिसरात स्वातंत्रवीर सावरकर यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला होता. तेव्हापासून राऊत यांच्या विरोधात कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी संतापून सुरू आज (ता. 8) दुपारी असलेली व्यवस्थापन परिषदेची बैठक उधळून लावली.

आंदोलनाला यश आले आणि त्यानंतर आज राऊत यांच्या विरोधात नागपुरातील अंबाझरी पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यात जाळपोळ करण्याचा प्रयत्न आणि विविध कलमांचा समावेश करण्यात आलेला आहे.

पुतळा जाळण्यापूर्वी कुलगुरू डाॅ. सुभाष चौधरी यांच्या दालनात जाऊन राऊत यांच्यासह १५ ते २० पदाधिकाऱ्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात घोषणाबाजीही केली होती. त्यानंतरही कुणाल राऊत यांच्या विरोधात विद्यापीठाने काहीही कारवाई केली नव्हती. त्याचे पडसाद आज विद्यापीठात व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत उमटले.

भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी सभागृहात जय श्रीरामचे नारे लावत चांगलाच गोंधळ घातला. यावेळी कुणाल राऊत यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत ठिय्या मांडला. विद्यापीठाची आज गुरुवारी दुपारी बारा वाजता व्यवस्थापन परिषदेची बैठक सुरू झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी भाजपचे शहर पदाधिकारी आणि अधिसभा सदस्य विष्णू चांगदे आणि भाजयुमोच्या शिवानी दाणी यांच्यासह पन्नासावर कार्यकर्ते सभागृहात शिरले. यावेळी घोषणाबाजी करीत त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे कुलगुरू डॉ सुभाष चौधरी यांनी बैठक काही वेळेसाठी स्थगित केली. आंदोलनादरम्यान आंदोलक हसत खेळत होते. गप्पा गोष्टी करीत तेथेच त्यांनी चहाचा आस्वादही घेतला. त्यामुळे आजचे आंदोलन आणि त्यानंतर लगेच तक्रार आणि कुणाल राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल, हे सर्व नियोजित होते की का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com