Bhandara : थँक्स..! अदितीताई तटकरे.... तुम्ही आल्या आणि आमच्यासाठी....

Bad Roads : मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे खणून ठेवलेल्या रस्त्यांवर लागले किमान सावधगिरीचे फलक
Diversion Boards on Bhandara Road.
Diversion Boards on Bhandara Road.Sarkarnama
Published on
Updated on

Mohadi : ‘धन्यवाद..! अदितीताई तुम्ही भंडारा जिल्ह्यात आल्या अन असंख्य भंडाराकरांचे अपघातापासून प्राण वाचविले’, असे मनातून आभार व्यक्त करणारे शब्द राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या तथा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्याबाबतीत लोकांकडून निघाले आहेत. तटकरे या भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या.

नागपूर येथून भंडारा जिल्हाच्या मोहाडी शहरात येण्यासाठी नागपूर-रामटेक-कांद्री मार्गाने त्यांचा ताफा आला. हा मार्ग निर्माणाधीन आहे. या मार्गावर आतापर्यंत धोक्याची सूचना देणारे कोणतेही फलक नव्हते. रस्ता अनेक ठिकाणी खणून ठेवण्यात आला आहे. मार्गावर रेडियम आदी कोणतीही खबरदारी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे अपघाताचा धोका कायम होता. अशात राज्याच्या मंत्री अदिती तटकरे यांचा अधिकृत शासकीय दौरा आला. त्यामुळे ‘प्रोटोकॉल’साठी प्रशासन कामाला लागले.

Diversion Boards on Bhandara Road.
Bhandara : मंत्री अदिती तटकरे आल्या, रिकाम्या खुर्च्यांमुळे आमदारावर नाराज झाल्या

जिल्ह्यातील महसूल विभागासह बांधकाम विभाग प्रशासनही सावध झाले. मंत्री ज्या मार्गावरून येणार आहेत, तो निर्माणाधीन असल्याची जाग प्रशासनाला आली. त्यामुळे रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीला झोपेतून जागे करण्यात आले. महामार्ग प्रशासनानेही रस्त्याची पाहणी केली. धोकादायक व अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या जागेवर सूचना फलक लावण्यात आलेत. रेडियम बसविण्यात आलेत. तात्पुरते कठडे उभारत रस्ता दुभाजक टाकण्यात आलेत.

मंत्र्यांच्या ताफ्याला कोणताही त्रास होऊ नये, याची खबरदारी घेण्यात आली. सत्ताधारी गटाचे आमदार राजू कारेमोरे यांनी आयोजित केलेल्या सरपंच मेळाव्याचा कार्यक्रमाला मंत्री तटकरे या उपस्थित होत्या. रामटेकच्या (जि. नागपूर) महादुलापासून जांब (जि. भंडारा) प्रयत्न मार्ग पूर्णपणे खड्ड्यात गेला आहे. अनेक ठिकाणी काम अपूर्ण आहे. अनेक पुलांचे काम अर्धवट आहे. रस्त्याच्या कडेला भर टाकण्यात आलेली नाही. त्यामुळे खोलवर खड्डे आहेत. निर्माणधीन रस्त्यावर प्रशासनाने आधीच धोक्याची सूचना देणारे फलक आणि रेडियम लावायला हवे होते. मात्र त्यासाठी त्यांनी मंत्र्याच्या दौऱ्याचा मुहूर्त साधला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोणतेही फलक किंवा रेडियम नसल्याने या मार्गावर रात्री अनेक अपघात घडले आहेत. यात काहींचा मृत्यू देखील झाला आहे. जे अपघातातून वाचले त्यापैकी काहींना अपंगत्व आले आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री या मार्गावरून प्रवास जीवघेणा ठरत होता. ‘वर्क इन प्रोग्रेस’ असे दाखविण्यात आलेल्या या रस्त्याच्या कामात गेल्या अनेक महिन्यांपासून कोणतीही प्रगती नव्हती. हे काम दुर्लक्षित होते. अशातच तटकरे यांच्या दौऱ्यामुळे किमान धोकादायक सूचना देणारे फलक व रेडियम लावण्यापुरते तरी काम झाले याचे समाधान आहे. या मार्गावरून दररोज सुमारे 10 हजारांवर वाहने येे-जा करतात. मार्ग निर्माणधीन असल्याने प्रवास करताना नागरिकांना त्रास होत आहे, अशी माहिती रामकृष्ण इटनकर व यशवंत थोटे यांनी ‘सरकारनामा’ला दिली. मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे किमान काही तर दखल घेतली गेली, असे ते म्हणाले.

Edited by : Prasannaa Jakate

Diversion Boards on Bhandara Road.
Bhandara : ‘पवारसाहेब देशाचे, राष्ट्रवादीचे नेते; पण निवडणूक आयोग ठरवेल पक्ष कोणाचा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com