Bachchu Kadu: मोठी बातमी! बच्चू कडूंना उच्च न्यायालयाचा दणका, अपात्रतेला स्थगिती देण्यास नकार

High Court : एका आंदोलनादरम्यान नाशिक येथे 2017 मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात बच्चू कडू यांना 2021 मध्ये एक वर्षाच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
Bachchu Kadu
Bachchu KaduSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते व माजी मंत्री बच्चू कडू यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. या निर्णयाला त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करत आव्हान दिले. न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार देत संबंधितांना नोटीस बजावत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.

या प्रकरणावर न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या समक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार, एका आंदोलनादरम्यान नाशिक येथे 2017 मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना 2021 मध्ये एक वर्षाच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सहकारी बँकेच्या नियमानुसार एक वर्षाची शिक्षा झाल्यास संबंधित व्यक्ती संचालक म्हणून अपात्र ठरतो.

याच पार्श्वभूमीवर विरोधी गटाने सहकार विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार विभागीय सहनिबंधक प्रवीण फडणीस यांनी बच्चू कडूंच्या अपात्रतेचा निर्णय दिला. या निर्णयाविरोधात कडूंनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. कडूंनी शिक्षेला स्थगिती आणि अंतरिम दिलासा देण्याची विनंती केली.

परंतु, संचालक मंडळाने कॅव्हेट दाखल करून कोणताही निर्णय त्यांची बाजू ऐकल्याशिवाय देऊ नये, अशी मागणी केली होती. कडूंनी यापूर्वी या प्रकरणात उच्च न्यायालयात (HIgh Court) धाव घेतली होती. तेव्हा न्यायालयाने या शिक्षेला स्थगिती न देता केवळ शिक्षा निलंबित केली होती,

Bachchu Kadu
Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरेंनी नितेश राणेंचंं सगळंच काढलं; म्हणाले, उंची पेंग्विनची,चाल बदकाची अन् आवाज...

ही बाब मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आली. त्यामुळे कायद्यानुसार स्थगिती मिळाल्याखेरीज कडूंना हे पद मिळू शकत नाही. तसेच, कडू यांना अंतरिम दिलासा दिला जाऊ नये, अशीही विनंती विरोधी पक्षाने केली.

यावर न्यायालयाने कारवाईला अंतरिम स्थगिती देण्यास नकार देत प्रतिवादींना नोटीस बजाववली. पुढील सुनावणी 24 जून रोजी निश्चित करण्यात आली आहे. कडू यांच्यातर्फे वरिष्ठ विधिज्ञ आर. एल. खापरे यांनी, मंडळातर्फे ॲड. ऋग्वेद ढोरे यांनी बाजू मांडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com