BRS Nagpur News : कोण कार्यक्षम आणि कोण ‘बी टीम’, हे आता महाराष्ट्राची जनताच ठरवेल !

KCR : हा पक्ष महाराष्ट्रात दाखल झाल्यास आपलाही खालसा होईल, ही भिती.
Pravin Shinde BRS
Pravin Shinde BRSSarkarnama
Published on
Updated on

Aam Aadmi Party was initially called the B team of BJP : तेलंगण राज्याचा दहा वर्षांत अभूतपूर्व विकास झाला आहे. शेतकरी, युवक आणि दलित-ओबीसी सर्वच समाधानी आहेत. हा पक्ष महाराष्ट्रात दाखल झाल्यास आपलाही खालसा होईल, अशी भीती वाटत असल्याने विरोधकांमार्फत भारत राष्ट्र समितीची भाजपची बी टीम म्हणून बदनामी केली जात आहे. (Bharat Rashtra Samiti is being maligned as B team of BJP)

आम आदमी पार्टीलाही सुरुवातीला भाजपचीच बी टीम म्हटले जात होते. आज दिल्ली आणि पंजाब अशा दोन राज्यांत आपची सत्ता आहे. भाजपपुढेच त्यांनी आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे विरोधकांचे आरोप किती फोल आहेत, हे स्पष्ट होते, असे बीआरएसचे प्रवीण शिंदे यांनी आज (ता. २६) सांगितले.

शिंदे म्हणाले, आम्ही सर्वच जण सध्या कार्यकर्ता म्हणून पक्षात काम करीत आहोत. समन्वयक म्हणून जबाबदाऱ्या पार पाडत आहोत. सदस्य नोंदणी जोरदार सुरू आहे. नागपूर विभागातील आतापर्यंत विविध पक्षांच्या हजार कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. तेवढेच प्रवेश करण्यास तयार आहेत.

माजी आमदार, माजी खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांचाही समावेश आहे. शेतकरी आणि ओबीसी समाजासाठी आजवरच्या एकही मुख्यमंत्री आणि राजकीय पक्षाने काम केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. मात्र सरकार म्हणून महाविकास आघाडी आणि शिंदे सेना गांभीर्याने काही करीत नसल्याचे दिसून येते.

Pravin Shinde BRS
BRs News : बीआरएसची वाढती लोकप्रियता बघून विरोधकांकडून षड्यंत्र !

तेलंगणात जाऊन आपण तेथील विकास प्रत्यक्ष बघितला. शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला आणि बीआरएसमध्ये दाखल झाल्याचे प्रवीण शिंदे यांनी सांगितले. बीआरएसचे सध्या मायक्रो पातळीवर काम सुरू आहे. सदस्य नोंदणी केल्यानंतर ज्या निवडणुका जाहीर होतील त्या सर्व स्वबळावर पक्षातर्फे लढण्यात येणार आहेत.

त्याचा फटका काँग्रेसला (Congrss) बसेल की भाजपला हा आमचा विषय नाही. आम्हाला फक्त शेतकऱ्यांची, गोरगरीब जनतेची काळजी आहे. जे तेलंगणात केले, ते महाराष्ट्रात करून दाखवायचे आहे.

Pravin Shinde BRS
CM KCR: 600 वाहनांचा ताफा अन् अख्खं मंत्रिमंडळ सोबत; महाराष्ट्रात KCR यांची सिंघम स्टाईल एन्ट्री; पाहा खास फोटो !

आम्ही कोणाची बी टीम आणि कोणाची ए हे ज्याचे त्याचे त्यांनी नंतर ठरवावे. आमचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री (Chief Minister) चंद्रशेखर राव यांनी आजवर एकाही प्रकल्पाचे भूमिपूजन केले नाही. ते थेट उद्‍घाटनच करतात.

केसीआर यांनी तेलंगणमध्ये विक्रमी वेळेत मोठमोठे सिंचन प्रकल्प मार्गी लावले. त्या उलट पूर्व विदर्भातील (Vidarbha) एकमेव सर्वाधिक मोठा सिंचन प्रकल्प गोसेखुर्दचे काय हाल आहेत, हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे कोण कार्यक्षम हे जनताच आता ठरवणार आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com