BRS News : महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना तेलंगणाने दिला आधार, महाराष्ट्र सरकार करतंय काय?

Maharashtra : भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्चही निघेनासा झाला.
B. J. Deshmukh, BRS.
B. J. Deshmukh, BRS.Sarkarnama
Published on
Updated on

K Chandrasekhar Rao came running to help farmers : रक्ताचं पाणी अन् हाडाची काडं करून पिकवलेला कांदा रस्त्यावर फेकून देण्याची वेळ महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांवर आली. कारण येथे त्यांना भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्चही निघेनासा झाला. अशा परिस्थितीत के. चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष कांदा उत्पादकांसाठी धावला आहे. (BRS party has run for onion growers)

महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी हा कांदा पिकाला भाव नसल्यामुळे अडचणीत सापडला आहे. कवडीमोल भावाने कांदा हा शेतकऱ्यांना विकावा लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा पिकवण्यासाठी आलेला खर्चही त्यामधून निघत नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मदतीला तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव धावून आले.

महाराष्ट्रातील काही ठिकाणचा कांदा हा आता तेलंगणा राज्यातील व्यापारी घेत आहेत. तसेच चांगला दरही मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू बघायला मिळत आहे. यासंदर्भात भारत राष्ट्र समितीचे समन्वयक बी. जे. देशमुख यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचा कांदा बाजारात आल्यानंतर कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. शेतकरी देशोधडीला लागलेला आहे.

कांदा उत्पादकांच्या अवस्थेकडे सत्ताधारी व विरोधकांचे लक्ष नाही. भारत राष्ट्र समितीचे नेते माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी व इतर नेत्यांनी कांदा दराबाबत चौकशी केली तर हैदराबादमध्ये साधारण कांद्याला १७०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. तर महाराष्ट्रात केवळ ३०० ते ४०० रुपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे.

B. J. Deshmukh, BRS.
KCR Nagpur News : जर लोकांना शंका असेल नकोच ती ईव्हीएम !

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन के. चंद्रशेखर राव व त्यांच्या सहकाऱ्यांना विनंती केली आणि त्यांनी या गोष्टीला सकारात्मक दृष्टीने बघून त्यांचे व्यापारी महाराष्ट्रात पाठवून येथील काही कांदा खरेदी केला आहे.

महाराष्ट्रातील (Maharashtra) शेतकऱ्यांना (Farmers) दिलासा देण्याचे काम तेलंगणा (Telangana) सरकारने केला आहे. ज्या महाराष्ट्रात शंभर लाख मॅट्रिक टन कांद्याचे उत्पादन होते. महाराष्ट्रातील शेतकरी देशोधडीला लागलेला असताना महाराष्ट्रातील सरकार शेतकऱ्यांबाबत उदासीन असल्याचा आरोपही देशमुख यांनी केला.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com