BSP Nagpur Election : 'बसपा'चा हत्ती रुतला आयाराम-गयारामांच्या गाळात; अस्तित्वासाठी धडपड...

Nagpur Municipal Election : नागपूर महापालिका निवडणुकीत बसपाला नेतृत्वाची गळती, मतदार विभागणी आणि नव्या राजकीय पक्षांच्या आव्हानामुळे बसपाला अस्तित्व टिकवण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
BSP, Nagpur
BSP, NagpurSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Municipal Election News : नागपूर महापालिकेच्या 2012 च्या निवडणुकीत बहुजन समाज पक्षाने मोठी हवा निर्माण केली होती. प्रथमच महापालिकेची निवडणूक लढलेल्या बसपाचे 12 नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत बसपाने आयात उमेदवारांना संधी देणे सुरू केले. आपली व्होट बँक वाढवायची आहे, असा दावा करणाऱ्या बसपाचे ‘पर्यटन' धोरण चुकले आणि आता ‘आयाराम-गयारामांचा‘ पक्ष, अशी ओळख पक्षाची झाली आहे. हे बघता महापालिकेच्या निवडणुकीत बसपाला आपल्या जागाही टिकवणे अवघड झाले आहे.

एकेकाळी नागपूरमध्ये रिपाइंचे चांगलेच वजन होते. उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात जोर होता. याशिवाय दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात काही पॉकेट्‍स रिपाइंचे होते. याच बळावर रिपाइंचे नगरसेवक निवडून येत होते. रिपब्लिकन आघाडीला मिळालेल्या यशामुळे रिपब्लिकन चळवळ नागपुरात गतीमान होत असतानाच आघाडीचे महापालिकेतील नगरसेवक सैरभैर झाले. कोणी भाजप, कोणी कॉंग्रेसला मदत करण्याच्या नादात आघाडीत बिघाडी कधी झाले हे कळले नाही.

याच दरम्यान बसपाच्या हत्तीने संधी साधली. बहुजन समाज पक्षाचे 2012 मध्ये 12 नगरसेवक निवडून आले. यानंतर 2017 मध्ये 10 नगरसेवक महापालिकेत निवडून आले. चार सदस्यांच्या प्रभागाचा फायदाही बसपाला झाला तर दुसरीकडे रिपांची ताकद कमकुवत झाली.

BSP, Nagpur
Santosh Deshmukh case : उज्वल निकम यांचं भाजप कनेक्शन संतोष देशमुख हत्या प्रकरणात अडथळा ठरणार? आरोपींनी केलेल्या 'त्या' मागणीमुळे सुनावणीत नवा पेच

नागपूर महानगरपालिकेत खोरिपसह रिपब्लिकन पक्षाला (RPI) आंबेडकरी मतदार ऑफ इंडियाच्या कॉंग्रेसचा वरचष्मा होता. मात्र विधानसभा जिंकायची असेल तर फक्त रिपाइंच्या व्होट बँकेवर अवलंबून राहता येणार नाही याची जाणीव अनेक नेत्यांना झाली. काहींनी काँग्रेस तर काहींनी भाजपला कवटाळले. नितीन राऊत याच यशस्वी झाले. त्यांना भाजपच्या डॉ. मिलिंद माने यांनी एकदा पराभवाचा धक्का देऊन उत्तर नागपूरमध्ये भगवा फडकावला होता.

BSP, Nagpur
Bachchu Kadu Vs BJP : भाजपचा बच्चू कडूंना धक्का, 'प्रहार'चा जिल्हाध्यक्ष फोडला!

2017 च्या निवडणुकीत जे राष्ट्रवादी काँग्रेस आणि (NCP) शिवसेनेला जमले नाही ते बसपाने करून दाखवले. बसपाचे 10 नगरसेवक निवडून आले. राष्ट्रवादीला एक तर शिवसेनेला दोन जागेवरच समाधान मानावे लागले. आता राष्ट्रवादी व शिवसेनेचे दोन तुकडे झाले आहेत. बसपा एकसंध असली तरी त्यांचे डझभर नेते पक्षाला सोडून गेले आहेत. काहींची पक्षानेच हकालपट्टी केली आहे.

आता रिपाइंप्रमाणे बसपाचेही (BSP) तुकडे व्हायला सुरुवात झाली आहे. खासदार चंद्रशेखर आझाद पार्टीने बसपाच्याच पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन पक्ष बांधणी सुरू केली आहे. ते बसपाच्या मतांवर डल्ला मारणार असल्याचे दिसून येते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत बसपाच्या हत्तीवर किती लोक स्वार होतात यावरच या पक्षाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com