Buldana Bhendval News : भेंडवळची भविष्यवाणी; 'देशाचा राजा' कायम राहणार...

Buldhana Political Prediction : आचारसंहिता असल्यामुळे राजकीय भवितव्य वर्तवण्यास काही मर्यादा आहेत. त्यामुळे सांकेतिक भाषेत निवडणूक भवितव्य वर्तवण्यात आले आहे.
Buldana Bhendval News
Buldana Bhendval NewsSarkarnama
Published on
Updated on

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्याच्या भेंडवळ येथील घटमंडणीचे भविष्यवाणीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. आज भेंडवळ घटमंडणीचे बहुप्रतीक्षित भाकीत वर्तवण्यात आले आहे. पीकपाणी कायम राहणार, रब्बीमध्ये पिकांमध्ये गहू हा चांगला राहील, असे भाकीत वर्तवण्यात आले. आचारसंहिता लागू असल्यामुळे राजकीय भविष्यवाणी वर्तवण्यात आले नाही. मात्र देशाचा राजा कायम राहणार, असे संकेत दिले आहेत. (Latest Marathi News)

Buldana Bhendval News
Ajit Pawar NCP : बारामतीत 'घड्याळा'च्या प्रचारासाठी आणलं अन् उन्हातान्हात उपाशी ठेवलं

राजा म्हणजे कोण?

भेंडवळच्या घटमांडणीत ज्या प्रमाणे पाऊस, हवामान, शेती, पीके याबाबत भाकीतं वर्तवलं जात, त्याचप्रमाणे निवडणुकीत कुठल्या पक्षाचा आघाडीचा विजय होणार? कुणाचा सत्ता येणार? याबाबतही भवितव्य वर्तवले जाते. मात्र आचारसंहिता असल्यामुळे राजकीय भवितव्य वर्तवण्यास काही मर्यादा आहेत. त्यामुळे सांकेतिक भाषेत निवडणूक भवितव्य वर्तवण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

Buldana Bhendval News
BJP Politics : दिंडोरीत शरद पवारांच्या कोंडीसाठी भाजपने 'असा' टाकला डाव

राजा कायम राहणार, असे भेंडवळची भविष्यवाणी आहे. राजा म्हणजेच पंतप्रधान अशी भेंडवळची सांकेतिक भाषा आहे. सध्या लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे.राज्यातील चौथ्या टप्प्याच्या निवडणुकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तीन टप्प्यात झालेल्या मतदानानाने (Voting) चिंता वाढली आहे. महायुती आणि आघाडीकडून आम्हीच सत्तेत येणार असा दावा केला जात असताना, 'भेंडवळच्या भविष्यवाणीने देशाचा राजा कायम असेल,' असे भाकीत वर्तवले आहे.

Buldana Bhendval News
Ajit Pawar NCP : बारामतीत 'घड्याळा'च्या प्रचारासाठी आणलं अन् उन्हातान्हात उपाशी ठेवलं

राजकीय भाकितावर संकट -

भेंडवळची घटमांडणी होण्यापूर्वीच याचा वाद उफाळून आला होता. अभयसिंह मारोडे यांच्याकडून ही घटमांडणी म्हणजे थोतांड आहे. विज्ञानाच्या कसोटीवर टिकणारे नाही, असा आक्षेप घेण्यात आला होता. शेतकऱ्यांना अशा भाकि‍तांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मोरोडे यांनी केले. देशाच आचारसंहिता (Election) लागू आहे. राजकीय भाकितं केल्यास आयोगाकडे तक्रार करु, असा इशाराच मोरोडेंनी दिला होता. त्यामुळे राजा कायम राहणार इतकंच मर्यादित भाकीत वर्तवण्यात आले .

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com