Buldana Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावरचा ‘हा’ सर्वाधिक बळी घेणारा अपघात !

Samruddhi Highway : गेल्या सहा महिन्यांत वाहनांचे टायर फुटून समृद्धीवर ८१ अपघात झाले.
Accident on Samruddhi Highway, Buldhana District
Accident on Samruddhi Highway, Buldhana DistrictSarkarnama
Published on
Updated on

Nagpur to Shirdi stage was inaugurated by Narendra Modi : सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा येथे समृद्धी महामार्गावर आज (ता. १ जुलै) पहाटे दीड वाजताच्या सुमारास खाजगी लक्झरी बसचा भीषण अपघात बसचा टायर फुटल्याने झाल्याचे सांगण्यात येते. गेल्या सहा महिन्यांत वाहनांचे टायर फुटून समृद्धीवर ८१ अपघात झाले, तर आजचा अपघात हा ८२ वा असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. (Today's accident is the 82nd)

११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते नागपूर (Nagpur) ते शिर्डी (Shirdi) या टप्प्याचे उद्घाटन झाले. त्यानंतर मे २०२३ पर्यंत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) समृद्धी महामार्गावर ३५८ अपघात झाल्याची महामार्ग पोलिसांची माहिती आहे. शिर्डीवरून दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर अपघातांच्या प्रमाणात अधिक वाढ झाल्याचे दिसून आले आहे. समृद्धीवरील दरदिवशीचे नवे अपघात ही चिंतेची बाब झाली आहे.

‘महामार्ग संमोहन’ या कारणामुळे चालकाला डुलकी लागून १०४ अपघात घडले आहेत. आजवर समृद्धीवरच्या अपघातांमध्ये ३९ जण मृत्यू पावले, तर आजच्या २५ मृतांमुळे हा आकडा ६४ झाला आहे. अपघातांमध्ये १३४ गंभीर तर २३६ किरकोळ जखमी झाले आहेत. १५३ किरकोळ अपघातांमध्ये कुणीही जखमी झाले नाही.

उष्ण तापमान, वाहनांचा अतिवेग यामुळे टायर फुटणे, महामार्ग संमोहनामुळे चालकाला डुलकी लागून वाहन अनियंत्रित होऊन कठड्यांना धडकणे, अन्य वाहनाला धडक देणे अथवा रस्त्याच्या खाली जाऊन अपघात घडणे, या कारणांमुळे घडलेल्या अपघातांची मालिका मोठी आहे.

Accident on Samruddhi Highway, Buldhana District
Sharad Pawar on Buldhana Bus Accident: पाच लाख रुपये देऊन प्रश्न मिटणार नाही..; शरद पवारांनी राज्य सरकारला फटकारले

प्राणी आडवे आल्याने १८ अपघात; तर तांत्रिक बिघाडामुळे १६ आणि वाहन बिघाड होऊन १४ अपघात समृद्धीवर घडले. इतर काही कारणांमुळे ७४ अपघात झाले. वाहनाचा अतिवेग हे अपघातांमध्ये प्रमुख कारण आहेच. चालकांना प्रबोधन करण्यासाठी परिवहन विभागाने समृद्धीच्या इंटरचेंजवर विशेष कॅम्प घेतले.

येवढे करूनही अपघातांची मालिका सुरूच आहे. कारण प्रतिदिन नवनवीन वाहने या महामार्गावर धावत असतात. आजचा खाजगी लक्झरीचा अपघात हा समृद्धीवरचा सर्वाधिक बळी घेणारा अपघात ठरल्याने अपघातरोधक उपाययोजना राबविण्याबाबत शासनाने हा विषय गांभीर्यपूर्वक घेणे गरजेचे झाले आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com