Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : मुख्यमंत्री शिंदेंच्या खास शिलेदाराचं आदित्य ठाकरेंना ओपन चॅलेंज, म्हणाले...

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे प्रसिद्धीसाठी मुख्यमंत्री शिंदेंना राजीनामा द्या, तुमच्याविरोधात मी ठाण्यातून लढतो, असे आव्हान देतात
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Buldhana Political News : बुलडाणा दौऱ्यावर असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खासदार प्रतापराव जाधवांवर सडकून टीका केली होती. जाधव निष्क्रीय असल्याचेही ठाकरे म्हणाले होते. ठाकरेंचे हे वक्तव्य जाधवांच्या चांगलेच जिव्हारी लागले. आता त्यांनी उद्धव ठाकरेंना उत्तर देताना आदित्य यांना ओपन चॅलेंज दिले आहे. मी निष्क्रीय असेल तर आदित्य ठाकरेंनी बुलडाण्यात येऊन लढावे. त्यांच्याविरोधात मी लढायला तयार आहे, असे म्हणत जाधवांनी ठाकरेंचा समाचार घेतला.

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) मुख्यमंत्री शिंदेंविरोधात लढण्याची वारंवार भाषा करतात. याचाही जाधवांनी समाचार घेतला. ते म्हणाले, केवळ प्रसिद्धीसाठी आदित्य ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंना राजीनामा द्या, तुमच्याविरोधात मी ठाण्यातून लढतो, असे आव्हान देतात. आता माझेच त्यांना चॅलेंज आहे की त्यांनी बुलडाण्यात येऊन लढावे. त्यांच्याविरोधात मी लढायला तयार आहे. जाधवांच्या या टीकेनंतर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येणार याकडे लक्ष आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Lok Sabha Election 2024 : नगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार कोण ? खासदार विखेंच्या विधानाने खळबळ

उद्धव ठाकरेंची टीका

बुलडाणा दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) प्रतापराव जाधवांवर घणाघात केला होता. आगामी निवडणुकीत अनेकांना भाजपच्या तिकिटावर लढावे लागणार असल्याचा दावा ठाकरेंनी वारंवार केला आहे. हाच धागा पकडून ठाकरे म्हणाले होते, येथील गद्दार खासदारांनी जाहीरपणे सांगावे की, ते भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार नाहीत. बुलडाण्याचे खासदार निष्क्रीय आहेत. त्यांना फक्त बाळासाहेबांचे नाव हवे, त्यांचा चेहरा पाहिजे, शिवसेना नाव हवे. आशीर्वाद मात्र मोदींचाच पाहिजे, अशी टीकाही ठाकरेंनी नाव न घेता जाधवांवर केली होती.

प्रताप जाधवांचं आव्हान

ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) म्हणाले, उद्धव ठाकरे मला निष्क्रीय समजतात. आता त्यांनी हिंमत असेल तर आदित्य ठाकरेंना बुलडाण्यात पाठवावे. त्यांच्याविरोधात मी लढायला तयार आहे. हे आदित्य ठाकरे प्रसिद्धीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वारंवार चॅलेंज देतात. म्हणतात, राजीनामा द्या, तुमच्याविरोधात ठाण्यामधून मी उभा राहतो. आता मीच त्या आदित्य ठाकरेंना बुलडाण्यातून माझ्याविरोधात लढण्याचे चॅलेंज देतो. ते त्यांनी स्वीकारावे, असे आवाहनही त्यांनी केले.

(Edited by Sunil Dhumal)

R

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Basavraj Patil News : काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का; मराठवाड्यातील बड्या नेत्याचा राजीनामा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com