Lok Sabha Election 2024 : नगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार कोण ? खासदार विखेंच्या विधानाने खळबळ

BJP MP Dr Sujay Vikhe Patil : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार विखे हे पुन्हा भाजपकडून उमेदवारीचे प्रबळ दावेदार आहेत.
Sujay Vikhe Patil
Sujay Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Political News: भारतीय जनता पक्षाचे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांनी उमेदवारीवर निर्वाणीचे भाष्य केले आहे. त्यांचे हे भाष्य भाजपमध्ये नगर दक्षिणमध्ये उमेदवारीवरून सर्वकाही आलबेल नाही, हे स्पष्ट करते. त्यामुळे राजकीय वर्तुळात नगर दक्षिणमधून भाजपकडून उमेदवारी कोणाला? याची उत्सुकता वाढली आहे. (Ahmednagar Lok Sabha Constituency)

खासदार विखे हे आता सात-आठ दिवस खासदार आहेत. त्यानंतर आचारसंहिता लागू होईल. आता संधी मिळाली किंवा नाही मिळाली, तरी काही वाटणार नाही. थोडी विश्रांतीही घेतली पाहिजे, असे सूचक वक्तव्य त्यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. खासदार विखे यांच्या या वक्तव्याचे अनेक अन्वयार्थ राजकीय विश्‍वात निघू लागले आहेत. सावेडीत महासंस्कृतिक महोत्सवाच्या कार्यक्रमात खासदार विखे यांनी हे विधान केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sujay Vikhe Patil
Loksabha Election 2024 : भाजपकडून आणखी एक माजी आयपीएस अधिकारी लोकसभेच्या रिंगणात; मतदारसंघही ठरला

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार विखे हे पुन्हा उमेदवारीचे प्रबळ दावेदार आहेत. नगर शहरात उड्डाणपूल, शहराबाहेरून साडेनऊशे कोटींचा बाह्यवळण रस्ता व अन्य कोट्यवधींची कामे त्यांनी मार्गी लावली आहेत. मात्र, त्यांच्या उमेदवारीला पक्षातूनच आव्हान मिळत आहे. विधान परिषदेचे आमदार व माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनीही लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा जाहीर केली आहे.

विखे यांनी अनेकदा केलेल्या विकासकामांचाही लेखाजोखा मांडल्याने त्यांची तयारी व उमेदवारीही पक्की मानली जात असतानाच आमदार शिंदे यांनीही लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे अनेकदा स्पष्ट केल्याने नगरच्या जागेवरून भाजपत अंतर्गत रस्सीखेच असल्याचे दिसत आहे. अशात खासदार विखेंनी निर्वाणीचे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे भाजप (BJP) या जागेसाठी खांदेपालट करते की काय, अशा चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, लोकसभेच्या उमेदवारीच्या दृष्टीने राज्यात सर्वच राजकीय पक्षांमध्ये हालचालींनी जोर धरला आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व महायुतीकडून उमेदवारांची नावे निश्‍चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दोन्हींकडे काही जागा फायनल झाल्या, तर काही जागांवर आपसातच रस्सीखेच सुरू आहे. तर दुसरीकडे दोन्हीकडील समर्थकांना आपला उमेदवार कोण, याची प्रतीक्षा आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

R

Sujay Vikhe Patil
Basavraj Patil News : काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का; मराठवाड्यातील बड्या नेत्याचा राजीनामा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com