Buldhana fire : शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याच्या बंगल्यात मोठा स्फोट, आगीत किचन जळून खाक

Rajendra Shingane Bungalow Blast : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या बंगल्यात मोठा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. बुलढाणा येथील त्यांच्या बंगल्यात हा स्फोट झाला असून सुदैवाने स्फोट झाला त्यावेळी घरात कुणीही नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Rajendra Shingane Bungalow Blast
Rajendra Shingane Bungalow BlastSarkarnama
Published on
Updated on

Buldhana News, 19 Jun : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या बंगल्यात मोठा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. बुलढाणा येथील त्यांच्या बंगल्यात हा स्फोट झाला असून सुदैवाने स्फोट झाला त्यावेळी घरात कुणीही नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मात्र, या स्फोटामुळे बंगल्याचं मोठं नुकसान झालं असून किचनमधील सर्व साहित्य जळालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या बुलढाण्यातील चिखली मार्गावर असलेल्या बंगल्यात अचानक मोठा स्फोट झाला.

Rajendra Shingane Bungalow Blast
Pune road accident : जेजुरीत कार अन् टेम्पोचा भीषण अपघात, हॉटेलसमोरच 8 जणांवर काळाचा घाला

या स्फोटानंतर किचनला आग लागली. या आगीत किचनमधील साहित्य जळून खाक झालं. आग वाढत असतानाच सुरक्षारक्षकाने तात्काळ अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी येत आग आटोक्यात आणली.

दरम्यान, सदर आगीची घटना ही किचनमधील फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्यामुळे घडल्याचं समोर आलं आहे. बुधवारी (ता. 18) सायंकाळी 7 च्या सुमारास ही घटना घडली. हा स्फोट इतका भयानक होता स्फोटानंतर किचनमधील साहित्य सर्वत्र विखुरले.

Rajendra Shingane Bungalow Blast
Shivsena UBT-MNS Alliance : 'मनसे'बाबत 'त्या' निर्णयासाठी माजी नगरसेवकांकडून उद्धव ठाकरेंना हिरवा झेंडा! राजीनामा दिलेल्या तेजस्विनी घोसाळकरही बैठकीला

तर आगीमुळे किचनच्या भिंती काळ्या पडल्या आहेत. ही घटना घडली तेव्हा घरात मंत्री शिंगणे यांचे मानसपुत्र पुष्पक शिंगणे, त्यांची पत्नी व काही कर्मचारी उपस्थित होते. मात्र, त्यांना कोणतीही इजा झाली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com