बुलडाणा : बनावट कागदपत्रे, शिक्के तयार करून सरकारी यंत्रणांना फसवणण्याचे अनेक प्रकार समोर येतात. असाच एक प्रकार घडला असून येथील एका व्यापाऱ्याने थेट केंद्र सरकारचीच (Modi Government) फसवणूक केल्याचे स्पष्ट झालं आहे. या व्यापाऱ्याने एक-दोन कोटी नव्हे तर तब्बल 100 कोटी रुपयांचा जीएसटी बुडवल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खामगाव येथील GST कर सहायक आयुक्त चेतनसिंग राजपूत (Chetan Singh Rajput) यांनी केलेल्या चौकशीत हे स्पष्ट झाले आहे. नितीन टावरी (Nitin Tawari) असं या व्यापाऱ्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
टावरी याने हे प्रकरण कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून बनावट कागदपत्रे तयार करून अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या आणि शिक्केही वापरले आहेत. खामगाव येथील MIDC मध्ये देवकी ऍग्रो इंडस्ट्रीचा टावरी हा मालक आहे. त्याने 2017-18 या आर्थिक वर्षाच्या 9 महिन्याच्या काळात तब्बल 1 कोटी 75 लाखांच्या जवळपास GST बुडवल्याचे एका ऑडिट मधून स्पष्ट झालं आहे.
त्याचप्रमाणे बनावट दस्तऐवज आणि अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या आणि शिक्के वापरून करचोरीचा प्रकार घडला आहे. त्यामुळे टावरी विरुद्ध विविध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टावरी या व्यापाऱ्याकडे तब्बल 6 कंपन्या आहेत व या कंपन्यांचे ऑडिट केल्यानंतर तब्बल 100 कोटी रुपयांच्या GST कर बुडवल्याचे तपास समोर आल्याचा दावा जीएसटीचे सहायक आयुक्त चेतनसिंग राजपूत यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.