Bus Driver Brutally Beaten : बसचालकाला बेदम मारहाण, कारवाई शून्य, आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर नमले पोलिस !

Yavatmal Police : ज्ञानेश्वर देवराव जाधव असे मारहाण झालेल्या एसटी बसचालकाचे नाव आहे.
Bus Drivers at Politc Stateion.
Bus Drivers at Politc Stateion.Sarkarnama
Published on
Updated on

Yavatmal Crime News : भरधाव खासगी वाहन एसटी बसवर येत असल्याचे पाहून चालकाने बस नियंत्रित केली. तरीदेखील खासगी वाहन बसला धडकले. त्यानंतर ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ या म्हणीप्रमाणे खासगी वाहनातील लोकांनी खाली उतरून एसटी बसचालकाला स्टिअरिंगवरून खाली ओढले. त्यानंतर पट्ट्याने बेदम मारहाण केली.

चूक नसताना चालकाला कशाला मारहाण करता, असा प्रश्न मारहाण करणाऱ्यांना काही प्रवाशांनी केला. तेव्हा ते व्यक्ती प्रवाशांच्या अंगावरही चालून गेले. दिवसाढवळ्या घडलेली ही घटना काही प्रवाशांनी मोबाईलद्वारे चित्रीत केली. त्यानंतर त्या चालकाने थेट अवधूतवाडी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तक्रार घेण्यासाठी पोलिसांनी टाळाटाळ केली. त्यानंतर संतप्त एसटी बसचालक आणि सहकारी कर्मचाऱ्यांनी थेट ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला.

Bus Drivers at Politc Stateion.
Yavatmal : कृषी महोत्सवाला शेतीविषयक दर्दी नव्हे खवय्यांचीच झाली गर्दी; राजकीय अनास्थाही!

एसटी बसचालक आणि त्याचे सहकारी आक्रमक होत असल्याचे बघून पोलिसांनी नमते घेतले आणि प्रकरण ‘संघटना’ पातळीवर जाऊ नये, म्हणून मग गुन्हे दाखल केले. भादंवि २७९, ३३७, ४२७, ३५३, ३३२, ३४ आणि मोटार वाहन कायदा १८४ नुसार खासगी वाहनचालक व त्याच्या साथीदारावर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर कुठे एसटी वाहनचालक शांत झाले. ज्ञानेश्वर देवराव जाधव असे मारहाण झालेल्या एसटी बसचालकाचे नाव आहे. ते यवतमाळ आगारात नोकरीला आहेत.

काल (ता. २२) सकाळी नेहमीप्रमाणे ते घाटंजी येथे नियमित बसफेरी घेऊन गेले. त्यानंतर तेथून परत येत असताना धामणगाव-अकोलाबाजार महामार्गावरील यवतमाळ येथील घाटंजी रोड बायपास परिसरात पोहोचत होते. दरम्यान, विरुद्ध दिशेने खासगी वाहन (एमएच 31 ईक्यू-1101) भरधाव येत होते. बसचालक ज्ञानेश्वर जाधव यांना ते वाहन बसवर धडकेल, याची कल्पना आली. त्यामुळे त्यांनी बस रस्त्याच्या कडेला घेत ती नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाला खासगी वाहन नियंत्रित झाले नाही. परिणामी ते वाहन बसला धडकलेच. ते पाहून खासगी वाहनातील चालकासह सर्वच वाहनाबाहेर निघाले.

एवढेच नव्हे, तर त्यांनी बसचालकाला स्टिअरिंगवरून खाली खेचत कंबरपट्ट्याने आणि चापटा मारीत बेदम मारहाण केली. यावेळी काही प्रवाशांनी मारहाण करणाऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र मारहाण करणारे प्रवाशांच्या अंगावरच चालून गेले. त्यामुळे त्यांचाही नाइलाज झाला. अखेर वाहकाने यवतमाळ एसटी आगारातील वरिष्ठांना या घटनेची माहिती दिली. शिवाय एसटी बसचालक आणि वाहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही ही बाब मोबाईलवरून कॉल करीत कळविली. संघटनेचे पदाधिकारी चालकाच्या मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले. तोवर खासगी वाहनाचा चालक आणि मारहाण करणारे व्यक्ती पसार झाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

घटनेनंतर एसटी बसचालक जाधव यांनी बस थेट अवधूतवाडी पोलिस ठाण्यात आणली. यावेळी त्यांनी डायरीवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना रीतसर तक्रार दिली. मात्र त्यांनी एसटी बस हे मोठे वाहन असल्याने तुमच्यावरच गुन्हा दाखल होईल, असा इशारा देत तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. तेव्हा संतप्त झालेल्या एसटी बसचालक वाहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोवर गुन्हा दाखल होत नाही, तोवर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला. तेव्हा कुठे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र या घटनेने एसटी बसचालक आणि वाहकांत पोलिस प्रशासनाविरुद्ध असंतोष निर्माण झाला आहे.

Edited By : Atul Mehere

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com