Buldhana News : केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारले आहेत. त्यामुळे शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षांनीही केंद्र सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी थेट वाणिज्य मंत्र्यांनाच इशारा दिला आहे.
राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी खऱ्या अर्थाने अडचणीत आणण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. शेतकऱ्याला मारण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. एकीकडे सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकरी मरतोय तर आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मरणावर सरकार टपले, असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.
केंद्र सरकारने (Central Government) चार दिवसांत कांद्याच्या निर्यातीलवर लागू केलेले ४० टक्के निर्यात शुल्क रद्द केले नाही. तर दिल्लीतील वाणिज्य मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांच्या घरात कांदा नेऊन फेकणार असल्याचा इशारा तुपकर यांनी दिला. यामुळे कांदा प्रश्न आणखी तापणार असल्याचे बोलले जात आहे.
या निर्णयाविरोधात सोमवारपासून नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांमध्ये कांद्याचा लिलाव बंद ठेवण्यात आला आहे. जिल्हा कांदा व्यापारी संघटनेने हा निर्णय घेतला आहे. सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ राज्यातील सर्व बाजार समितीच्या सर्व घटकांनी बंद पाळावा, असे आवाहन बाजार समितीचे संचालक आणि उत्पादकांकडून केले जात आहे.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.