Pimpri-Chinchwad Politics: खासदार बारणेंनी दिला आमदार थोपटेंना शह ; हिंजवडीचा पिंपरी महापालिकेत समावेश करण्याची मागणी

Shrirang Barne & Sangram Thopte News: दहा वर्षांपासून रखडलेला हा विस्तार आता, तरी होणार का, याकडे त्रस्त आयटीयन्सचे लक्ष लागले आहे.
Srirang Barne, Sangram Thopte News
Srirang Barne, Sangram Thopte NewsSarkarnama
Published on
Updated on

Pimpri-Chinchwad Political News: लगतची गावे समाविष्ट होऊन शेजारच्या पुणे महापालिकेची हद्दवाढ झाल्यानंतर आता ती पिंपरी महापालिकेचीही होण्याची शक्यता आहे. कारण आयटी हब हिंजवडी, माण, मारुंजीसह सात गावे पिंपरी महापालिकेत घेण्याची मागणी स्थानिक खासदार शिवसेनेचे (शिंदे) श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नव्याने केली आहे. दरम्यान, दहा वर्षांपासून रखडलेला हा विस्तार आता, तरी होणार का, याकडे त्रस्त आयटीयन्सचे लक्ष लागले आहे.

आयटी पार्क असलेल्या हिंजवडीत सध्या ग्रामपंचात आहे. नागरी सुविधांचा विचार करता ती लाखो आयटीएन्स काम करीत असलेल्या आयटी हबसाठी पुरेशी ठरत नाही. त्यामुळे हिंजवडीसह माण, मारूजी, जांबे, नेरे, सांगवडे, गहुंजे ही हद्दीलगतची सात गावे पिंपरी पालिकेत घेण्याच्या हालचाली २०१३ पासून सुरु झाल्या. मात्र, अद्याप ती सामील झाली नव्हती. आता खासदार बारणे यांनी नव्याने ही मागणी केली आहे. तर, या गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका वा नगरपरिषद करण्यासाठी भोरचे कॉंग्रेस (Congress) आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांचे प्रयत्नांना आता यामुळे खीळ बसणार आहे. कारण बारणेंच्या मागणीवर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यावर ही गावे लवकरच पालिकेत येतील असा विश्वास बारणेंनी व्यक्त केला आहे.

Srirang Barne, Sangram Thopte News
Anil Deshmukh News: ‘समझोता करणार नाही’, असे म्हटल्यावर दुसऱ्याच दिवशी माझ्यावर धाड पडली !

का रखडला गावांच समावेश आणि झाली नाही पिंपरी महापालिकेची हद्दवाढ?

भाजप-राष्ट्रवादीचे राजकारण आणि मोक्याच्या जमिनी खरेदी-विक्रीचे अर्थकारण यामुळे हद्दवाढीचा हा विषय रखडला होता. हिंजवडी, माण...आदी गावांचा समावेश करण्याचा ठराव पिंपरी महापालिका सभेत २०१५ ला मंजूर झाला. तेव्हापासून राज्य शासनाकडे तो प्रलंबित आहे. यापूर्वी ११ सप्टेंबर १९९७ मध्ये हद्दीतलगतची १४ गावे पिंपरी पालिकेत आली होती. तर, शेवटची हद्दवाढ ही २००२ ला झाली. त्यावेळी अशाच राजकारणातून रखडलेल्या ताथवडेचा समावेश पिंपरी महापालिकेत अखेर झाला होता.

त्यानंतर हिंजवडीसह सात गावांची हद्दवाढ गेली आठ वर्षे नुसतीच चर्चेत आहे. अगदी सुरुवातीला चाकण, देहू, आळंदी, म्हाळुंगे, मोई, मारुंजी व लगतच्या वीस गावांच्या समावेशाचा मूळ प्रस्ताव होता. मात्र, चाकणसह लगतच्या गावकऱ्यांनी विरोध केल्याने तो बारगळला. त्यानंतर, शहराच्या उत्तरेकडील देहू, आळंदी, चिंबळी, कुरूळी, मोई, निघोजे, विठ्ठलनगर ही सात आणि हिंजवडी, माण, मारुंजी, जांबे, नेरे, गहुंजे, सांगवडे ही पश्चिमेकडील सात गावे अशा एकूण १४ गावांना समाविष्ट करण्याचा विचार पुढे आला. मात्र, पिंपरी महापालिका सभेने १४ ऐवजी हिंजवडीसह इतर सात गावांचाच समावेश करण्यावर शिक्कामोर्तब केले.

Srirang Barne, Sangram Thopte News
Arvind Kejriwal News : मुंबईत होणाऱ्या 'इंडिया'च्या बैठकीला मुख्यमंत्री केजरीवाल उपस्थित राहणार

दरम्यान, शासनाने देहू व लगतचा परिसर मिळून स्वतंत्र नगरपंचायत स्थापन करण्याचे आदेश दिले. त्यानंतरच्या घडामोडीत पुणे महानगर प्रदेश विकास क्षेत्र प्राधिकरणाची (पीएमआरडीए) ची स्थापना झाली. त्यांनी हिंजवडीसह सात गावे पिंपरी (Pimpri-Chinchwad) पालिकेत समाविष्ट करण्याची आवश्यकता नाही, अशी भूमिका घेतल्याने हा समावेश लटकला गेला. पीएमआरडीएच्या प्रस्तावित हिंजवडी नागरी विकास केंद्रात ही गावे समाविष्ट आहेत. त्यामुळे ही गावे वगळल्यास त्या केंद्राचे महत्त्व कमी होईल आणि त्यात आमूलाग्र बदल करावे लागतील. याशिवाय, हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रस्तावित आहे. अशी कारणे देऊन ही गावे पालिकेत समाविष्ट न करता पीएमआरडीएच्या हद्दीत राहणे आवश्यक आहे, असे मत पीएमआरडीएने शासनस्तरावर मांडलेले आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com