Nagpur News : ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसह विविध मागण्यासाठी नागपुरात समता परिषदेकडून साखळी उपोषण

OBC News : ओबीसींच्या विविध प्रश्नावर आपला लढा कायम सुरूच आहे, छगन भुजबळ
Chhagan Bhujbal News
Chhagan Bhujbal NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal News : नागपूर येथील संविधान चौकात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने स्वाधारच्या धर्तीवर ओबीसी (OBC) विद्यार्थ्यांसाठी आधार योजना लागू करण्यासह वसतिगृह आणि शिष्यवृत्तीसह विविध प्रश्नांवर साखळी उपोषण करण्यात येत आहे. आज (ता. ४) नागपूर दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी उपोषणस्थळी कार्यकर्त्यांची भेट घेतली.

यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रा. दिवाकर गमे, प्रदेश कार्याध्यक्ष बापू भुजबळ, नागपुर जिल्हा संघटक मनोज गणोरकर, महिला अध्यक्ष विद्या बहेकर, महानगर कार्याध्यक्ष आरिफ काझी, मिलींद पाचपोर, कविता मुंगळे, आरती पाचघरे, सुनयना यवतक, विशाल हजारे, विनय डहाके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Chhagan Bhujbal News
Nashik Politics : नाशिकमध्ये ठाकरे गटाला सुरुंग; राऊतांवर 'हा' आरोप; नगराध्यक्षासह सहा नेते व कार्यकर्ते शिंदेगटात...

या वेळी छगन भुजबळ म्हणाले की, ''ओबीसींच्या विविध प्रश्नावर आपला लढा कायम सुरूच आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना स्वाधारच्या धर्तीवर आधार योजना लागू करणे, प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह निर्माण करण्यासाठी आपला शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपण उपसमितीच्या माध्यमातून अनेक निर्णय घेतले होते. ओबीसी विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी आपला लढा सुरूच राहणार आहे.

Chhagan Bhujbal News
Odisha Train Accident: रेल्वेमंत्र्यांच्या मोठा खुलासा: कोरोमंडल एक्स्प्रेसच्या अपघाताचं खरं कारण आलं समोर

दरम्यान, संविधान चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व उपोषणस्थळी सर्व महापुरुषांच्या प्रतीमेस भुजबळ यांनी पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com