Nashik Politics : नाशिकमध्ये ठाकरे गटाला सुरुंग; राऊतांवर 'हा' आरोप; नगराध्यक्षासह सहा नेते व कार्यकर्ते शिंदेगटात...

Shivsena Political News : ''...म्हणून आम्ही ठाकरे गट सोडण्याचा निर्णय घेतला.
Nashik Politics
Nashik PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : ठाकरे गटाचे खासदार व नेते संजय राऊत हे भाजपसह शिंदे गटावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. तर दुसरीकडे राज्यातील सत्तांतरानंतर मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्यानं ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के देत आहेत. संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असतानाच शिंदे गटानं संधी साधत ठाकरे गटाला मोठा सुरुंग लावला आहे. यात सुरगणा नगरपंचायतमधील सहा नगरसेवकांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत वर्षा या शासकीय निवासस्थानी नाशिकमधील सुरगणा नगरपंचायतीतील शिवसेनेत पक्षप्रवेश पार पडला. हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. सुरगाणा नगरपंचायतमधील विद्यमान नगराध्यक्ष भारत वाघमारे, गटनेता सचिन आहेर, नगरसेविका पुष्पा वाघमारे, नगरसेविका अरुणा वाघमारे, नगरसेविका प्रमिला वाघमारे, नगरसेवक भगवान आहेर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही धनुष्यबाण हाती घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश देत भाऊ चौधरी यांनी ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे.

Nashik Politics
NCP OBC Melava : अहमदनगरचे नामांतरण घाईघाईने करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीसांनी का घेतला?; जयंत पाटलांनी सांगितले कारण....

जावळी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे(Shashikant Shinde) यांचे मोठे वर्चस्व असून अलीकडच्या काळात भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी तिथं आपलं वर्चस्व निर्माण केले आहे. पण आता आमदार शिंदे यांचे बंधू व माथाडी कामगार नेते ऋषिकांत शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे जावळीत शिंदे गटाची ताकद वाढणार आहे. त्याबरोबरच हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजेंना मोठं बळ मिळण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले ?

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी शिवसेने(Shivsena)त दाखल झाले आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. आपल्यावर विश्वास ठेवून या राज्यातील अनेक लोक शिवसेनेत सामील होत आहेत. सुरगाणा नगरपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं स्वागत करतो. माथाडी कामगार नेते ऋषिकांत शिंदे यांचा देखील खास स्वागत करतो.

Nashik Politics
Sanjay Raut Apologizes Ajit Pawar : राऊत नरमले ; " अजितदादांबाबत मी असे बोलायला नको होते ; धरणामध्ये xxxपेक्षा ..

गेली अनेक वर्षे माथाडी कामगारांच्या न्याय हक्कासाठी ऋषिकांत शिंदे मोठ्या प्रमाणावर मेहनत घेत आहेत. आपण ज्या विश्वासाने शिवसेनेत सामील होत आहात तो विश्वास आपला सार्थ होईल. मागील 10-11 महिन्यात सरकारने जे निर्णय घेतले आहेत ते लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे. सर्व योजनांचे फायदे एकाच छताखाली देण्याचे आपण काम करायचं आहे, असंही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

राऊतांच्या वाचाळ वृत्तीस कंटाळून...

नाशिकमधील सुरगाणा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह सर्वच नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिंदे गटात प्रवेश करताना या नगरसेवकांनी संजय राऊत(Sanjay Raut) यांच्यावर गंभीर आरोप केलेत. संजय राऊत यांच्या वाचाळ वृत्तीस कंटाळून आम्ही ठाकरे गट सोडण्याचा निर्णय घेतल्याचं नगरसेवकांनी म्हटलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com