Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील म्हणजे, उचलली जीभ अन् लावली टाळ्याला...

Statement in Paithan : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे नवीन वाद पेटू लागला आहे.
Chandrakant Patil and Khushal Bopache
Chandrakant Patil and Khushal BopacheSarkarnama
Published on
Updated on

Former MP Khushan Bopache News : आधी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेले विधान. त्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा वादावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी वारंवार महाराष्ट्राला डिवचण्याचे केलेले काम यामुळे राज्यातील राजकारण आधीच ढवळून निघाले आहे. त्यातच भाजप नेते उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे नवीन वाद पेटू लागला आहे.

कर्मवीर भाऊराव पाटील,डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) आणि महात्मा फुले यांनीही शाळा सुरू केल्या. पण शाळा सुरू करताना सरकारनं त्यांना अनुदान दिलं नाही. तर, त्यांनी लोकांकडे भीक मागितली अन् शाळा सुरू केल्या असं विधान चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं आहे.

पैठण येथील एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी शाळांच्या सरकारी अनुदानावर भाष्य केलं. पाटील म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील,डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनीही शाळा सुरू केल्या. पण त्यांना शाळा सुरू करताना सरकारनं अनुदान दिलं नाही. तर, त्यांनी लोकांकडे ‘शाळा चालवतोय, पैसे द्या’, अशा शब्दांत भीक मागितली. तेव्हाच्या काळात १० रुपये देणारे लोक होती. आता १०-१० कोटी रुपये देणारे लोक आहेत, असे पाटील म्हणाले.

पूर्व विदर्भातील भंडाऱ्याचे माजी खासदार आणि राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. खुशाल बोपचे यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, मी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो. एका कॅबिनेट मंत्र्याला अशा प्रकारचे वक्तव्य करणे, अशोभनीय आहे. ती वेळ काय होती, हे त्यांना समजून घेतलेले दिसत नाही. त्यावेळी महापुरुषांनी दान मागून शिक्षणाचे कार्य केले तर त्याला भिकेची उपमा देणे, अजिबात योग्य नाही. अशिक्षितांना शिक्षित करून त्यांनी देशाला प्रबुद्ध करण्याचे काम केले आहे.

Chandrakant Patil and Khushal Bopache
‘राष्ट्रवादी पुन्हा...’ हे गाणे वाजवून केले चंद्रकांत पाटील यांचे स्वागत!

या गोष्टीचे भान चंद्रकांत पाटलांना राहिलेले नाही. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला, अस पाटलांचे काम आहे. केवळ निषेध करून चालणार नाही. आता याबाबत कठोर भूमिका घेतली पाहिजे. हा केवळ ओबीसींचा नाही, महाराष्ट्राचा नाही, तर देशाचा अपमान आहे. अशा लोकांना ठिकाणावर आणण्यासाठी जनआंदोलन उभारण्याची गरज आहे आणि आता आमची तीच भूमिका राहील, असेही खुशाल बोपचे म्हणाले. कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या काळात भीक मागून शाळा सुरू केल्या. सरकारच्या अनुदानावर ते अवलंबून नव्हते, असे विधान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. भाजपच्या नेत्यांना झाले तरी काय, असा प्रश्‍न विचारला जातोय.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com