Chandrapur APMC Election : एकमेकांना पाण्यात पाहणारे नेते आले एकत्र, कुठे 'वज्रमुठ' सैल, कर कुठे ‘हातात’ 'कमळ'

Leaders : एकमेकांना पाण्यात पाहणारे नेते आता मांडीला मांडी लावून बसत आहे.
Chandrapur APMC
Chandrapur APMCSarkarnama
Published on
Updated on

Chandrapur District APMC Election News : चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची वाट बघून थकलेल्या सर्व पक्षीय राजकीय नेत्यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावली आहे. पक्षांची बंधन, विचारधारा बाजूला ठेवून युती-आघाडी झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी 'वज्रमुठ' सैल झालेली बघायला मिळत आहे. काही ठिकाणी ‘हातात’ 'कमळ' सामावले आहे. एकमेकांना पाण्यात पाहणारे नेते आता मांडीला मांडी लावून बसत आहे. (Leaders have staked their reputation in market committee elections)

चंद्रपूर जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २१० संचालकांसाठी तब्बल ४७६ उमेदवार रिंगणात आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर काल शुक्रवारी चिन्ह वाटप करण्यात आले. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील प्रस्तावित नोकर भरती थांबविण्यात खासदार बाळू धानोरकर यांचा मोठा वाटा आहे. तेव्हापासून बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत धानोरकर यांना वगळूनच चालतात.

मूलमध्ये कॉंग्रेस विरूद्ध कॉंग्रेस..

आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निमित्ताने हे दोघेही आमनेसामने आले आहेत. मूल बाजार समितीत १८ संचालकांना निवडून द्यायचे आहे. एक संचालक अविरोध निवडून आले. त्यामुळे आता १७ जागांसाठी ३१ उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप समर्थीत बहुतेक संचालकांनी रिंगणातून माघार घेतली.

धानोरकर आणि रावत समर्थीत गटातच लढत होणार आहे. येथे कॉंग्रेस विरुद्ध कॉंग्रेस असा सामना बघायला मिळेल. या बाजार समितीवर आजवर संतोष रावत गटाचे वर्चस्व राहिले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघातील ही बाजार समिती आहे.

Chandrapur APMC
APMC Elections : ‘प्रहार’सह भाजपला मदत करणाऱ्यांसोबत युती नको; शिवसेना संपर्क नेत्यांनी दिला दम !

कोरपना कृषी बाजार समितीत कॉंग्रेस-शेतकरी संघटना आणि भाजप स्वबळावर मैदानात उतरले आहे. १८ संचालकांसाठी तब्बल ५२ उमेदवार रिंगणात आहे. आमदार सुभाष धोटे, वामनराव चटप आणि संजय धोटे या माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक तब्बल आठ वर्षानंतर होत आहे. १८ पैकी एका संचालकांची अविरोध निवड झाली. आता १७ जागांसाठी ३७ उमेदवार रिंगणात आहेत.

या निवडणुकीत (Elections) एकमेकांना पाण्यात बघणारे भाजप (BJP) आणि कॉंग्रेसचे (Congress) नेते एकत्र आले. कोणत्याही परिस्थितीत शेतकरी संघटनेचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी त्यांनी विरोध बाजूला ठेवला. एक आजी आणि दोन माजी आमदारांशी शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार वामनराव चटप यांना दोन हात करावे लागणार आहे. काँग्रेस (Congress) १० आणि भाजप (BJP) आठ जागा लढवणार आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com