चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालकांसाठी ४३ उमेदवार रिंगणात उतरले आहे. या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे आणि कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे एकत्र आल्याचे बघायला मिळत आहे. या दोघांनी मिळून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश चोखारे यांच्या विरोधात जोरदार आघाडी उघडली आहे.
चोखारे यांना पदावरून हटविण्यात तत्कालीन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठी भूमिका बजावली. प्रकाश देवतळे वडेट्टीवार यांच्या शब्दाबाहेर नाहीत. त्यामुळे चोखारे यांना बाजार समितीची पायरी चढूच द्यायची नाही, या निर्धाराने भोंगळे- देवतळे एकत्र आले आहेत. त्याच्या सोबत गंगाधर वैद्य आहे. सहकार क्षेत्रातील जाणकार सुभाष रघाताटे यांच्या मार्गदर्शनात या आघाडीचा प्रचार सुरू आहे.
चोखारेंच्या मदतीला तूर्तास बाजार समितीचे माजी सभापती आणि जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊणकर आले आहे. खासदार बाळू धानोरकर यांनी दोन दिवसांपूर्वी चोखारेंच्या स्नेह भोजनाला हजेरी लावली होती. या भोजनाला चोखारेंना नेमका किती फायदा होईल, हे मतदानाच्या दिवशीच माहिती होईल. तूर्तास खासदारांना चोखारेंच्या बाजूने झुकते माप दिले आहे. त्यामुळे चंद्रपूर (Chandrapur) कृषी उत्पन्न बाजार समितीत माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार विरुद्ध खासदार बाळू धानोरकर असा सामना अप्रत्यक्षरीत्या बघायला मिळणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची वाट बघून थकलेल्या सर्व पक्षीय राजकीय (Political) नेत्यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावली आहे. पक्षांची बंधन, विचारधारा बाजूला ठेवून युती-आघाडी झाली आहे. बाजार समितीची निवडणूक आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तालीम असणार आहे.
या निवडणुकीतील (APMC Election) यशापयशावर पुढील निवडणुकांची (Election) गणिते लागणार आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालांवरून पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची गणिते ठरणार आहेत.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.