Chandrapur District Bank Recruitment: नोकरभरतीसाठी निवडली वादग्रस्त एजन्सी, सहकार आयुक्तांच्या पत्राला केराची टोपली !

Yavatmal District Bank : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील नोकरभरती प्रक्रियेत हीच एजन्सी होती.
Chandrapur District Central Co-Operative Bank.
Chandrapur District Central Co-Operative Bank.Sarkarnama
Published on
Updated on

Agency in news for district bank recruitment: ३६० पदांची नोकरी भरती प्रक्रिया राबविण्यासाठी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने निवड केलेली एजन्सीच वादग्रस्त आहे. सर्वसाधारणपणे नोकरभरतीची प्रक्रिया राबविणाऱ्या एजन्सीचे मुख्यालय महाराष्ट्रात असावे, असा नियम आहे. परंतु बॅंकेने सर्वात कमी दरपत्रक म्हणून पसंती दिलेली 'जेएसआर एक्झामिनेशन सर्व्हिस लिमिटेड' ही एजन्सी दिल्लीलगतच्या नोएडाची आहे. (The board of directors was given a blow by the cooperative department)

विशेष म्हणजे सहकार सचिवांकडे या एजन्सीचे नाव पाठविताना त्याचा पत्ता आणि ठिकाण लपविले. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील नोकरभरती प्रक्रियेत हीच एजन्सी होती. या भरतीप्रक्रियेत घोळ झाल्याच्या तक्रारीनंतर या एजन्सीची आता चौकशी सुरू आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील ३६० पदांच्या नोकरभरतीला राज्य शासनाने स्थगिती दिली होती. बॅंकेने या स्थगितीला न्यायालयात आव्हान दिले.

न्यायालयाने ३ मार्च २०२३ रोजी स्थगितीचा आदेश रद्द केला. दुसऱ्याच दिवशी बॅंकेच्या संचालक मंडळाची सभा झाली. तिसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात जाहिरात देऊन नोकरभरतीची प्रक्रिया राबविण्यासाठी एजन्सीचे प्रस्ताव मागविण्यात आले. सहा एजन्सीचे प्रस्ताव आले. त्यात चेन्नई, कोलकाता आणि नवी दिल्ली येथील प्रत्येकी एका एजन्सीचा समावेश होता. मात्र, भरतीसाठी कासावीस झालेल्या संचालक मंडळाला सहकार विभागाने दणका दिला.

६ मार्च २०२३ बॅंकेला सहकार विभागाकडून एक पत्र आले. त्यात सहकार आयुक्तांच्या स्तरावर पात्र संस्थांची तालिका तयार होईपर्यंत बॅंक स्तरावर ऑनलाइन भरतीप्रक्रियेसाठी संस्था निवडीची कारवाई करु नये, असे बजाविण्यात आले. दरम्यान सहकार सचिवांकडे बॅंकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी २९ मार्च २०२३ रोजी एक पत्र पाठविले. त्यात नोकरी भरतीसाठी प्राप्त एजंसींची नावे पाठविली.

Chandrapur District Central Co-Operative Bank.
Chandrapur Congress News : कॉंग्रेस जिल्हाध्यक्षांनी हाणून पाडला आमदार धानोरकरांना एकटं पाडण्याचा प्रयत्न!

या संस्था काळ्या यादीत आहे काय, याची माहिती मागितली. मात्र जेएसआर नेमकी कुठली आहे, याचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला, असा काही संचालकांचा आरोप आहे. यांसंदर्भात बॅंकेचे माजी मुख्याधिकारी अर्जुनकर यांनी तक्रार केली आहे. दरम्यान २० मे २०२३ रोजी नोकरभरतीसाठी आलेल्या एजन्सीचे प्रस्ताव संचालक मंडळासमोर ठेवण्यात आले. यावेळीसुद्धा तीन एजंसीचे ठिकाण व पत्ता लपविण्यात आला. सर्वात कमी दरपत्रक असल्यामुळे जेएसआर या एजंसीची निवड करण्यात आली. संचालक मंडळ सभेपुढे निविदाधारकांना न बोलविताच निविदा उघडली.

दुसरीकडे सहकार खात्याशी वारंवार संपर्क करुनसुद्धा त्यांनी नेमलेल्या एजन्सीच दाद देत नाही. त्यामुळे जेएसआरकडूनच नोकर भरतीची परवानगी देण्यात यावी, यासाठी बॅंकेने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने बॅंकेला पुन्हा या एजन्सींशी संपर्क साधण्यास सांगितले. बॅंकेला या संस्थांचा खर्च परवडत नसेल तर प्रतिव्यक्ती प्रमाणे दर मागावे, असे सुचविले आहे. सध्या एजन्सींचे नियुक्तीचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

Chandrapur District Central Co-Operative Bank.
Chandrapur BJP Assembly Election: भाजपचा नवा डाव; मनसेच्या नेत्यालाच केलं वरोरा विधानसभेचा प्रमुख

विशेष म्हणजे यवतमाळ नोकर भरती प्रक्रियेत जेएसआर कंपनी व चंद्रपूर जिल्हा बँकेकडे प्राप्त सहा निविदांमधील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी अमरावती या एजंसी होत्या. या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची लेखी तक्रार राष्ट्रवादीच्या एका माजी आमदाराने केली. त्यांच्या तक्रारीनंतर अप्पर आयुक्त विशेष निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांनी विभागीय सहनिबंधक, अमरावती यांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले.

ज्या संस्थेचे मुख्यालय महाराष्ट्राबाहेर, जी संस्था एका नोकर भरती प्रकरणात वादग्रस्त आहे, अशाच संस्थेसाठी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंक आग्रही का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. सहकार आयुक्तांनी बँकेला दिलेल्या १७ फेब्रुवारी २०२२च्या नोकर भरती परवानगी पत्रातील अटी शर्तीचे पालन होत आहे काय, यासंदर्भात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्याशी वारंवार संपर्क साधला. प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांच्या भ्रमणध्वनीवर प्रश्नावली पाठविली. परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

Chandrapur District Central Co-Operative Bank.
Aurangabad District Bank News : सत्तारांनी अध्यक्षपद दिले आणि त्यांनीच काढून घेतले ; नितीन पाटील यांचा राजीनामा..

नोकर भरती वादग्रस्तच..

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षांतील लेखापरीक्षकाच्या आधारे सहकारी कायद्याचे कलम ८८ अंतर्गत चौकशी सुरू आहे. यात ३.९७ कोटींची वसुलीसाठी संपूर्ण संचालक मंडळ आणि काही अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे. यापूर्वी २०१३ च्या नोकर भरतीमध्ये रेकॉर्डशी छेडछाड आणि गुणपत्रिका बदलवल्याचे समोर आल्याने लाचलुचपत खात्यानेच तत्कालीन अध्यक्ष, काही संचालक आणि अधिकारी यांच्यावर २०१७ ला गुन्हे दाखल केले आहेत.

मार्च २०२३ मध्ये उच्च न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यानंतर अनुकंपा तत्वावरील नोकर भरतीचा घोळ समोर आला. बॅंकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांना तुरुंगात जावे लागले. आता नोकर भरतीला परवानगी मिळाली आहे. संचालक मंडळातील सदस्य तेच आहेत.

यवतमाळ (Yavatmal) जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील नोकर भरती प्रकरणात प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने 'जेएसआर एक्झामिनेशन सर्व्हिस लिमिटेड, नोएडा आणि महाराष्ट्र (Maharashtra) इन्स्टिट्यूट ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी, अमरावती (Amravati) या दोन्ही एजंसीची चौकशी सुरू आहे. कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे, असे यवतमाळ जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com