Chandrapur Bank News : आयबीपीएस, टीसीएसकडून नोकर भरती करा, शिंदेंचे अध्यक्षांना पत्र; अन् दिला राजीनामा !

Internal Politics : बॅंकेचे अंतर्गत राजकारण ढवळून निघाले आहे.
Ravindra Shinde, Chandrapur District Central Co-operative Bank
Ravindra Shinde, Chandrapur District Central Co-operative BankSarkarnama
Published on
Updated on

Chandrapur District Central Co-operative Bank Recruitment of employees : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांचे विश्वासू रवींद्र शिंदे यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे बॅंकेचे अंतर्गत राजकारण ढवळून निघाले आहे. राजीनामा देण्यापूर्वी शिंदे यांनी बॅंकेला पत्र लिहून पारदर्शी भरती प्रक्रिया राबविण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार आयबीपीस किंवा टीसीएस या कंपनीची निवड करावी, अशी मागणी केली आहे. (The internal politics of the bank has been stirred up.)

बॅंकेने मात्र नोकर भरती प्रक्रियेत अनियमितता केल्याची चौकशी सुरू असलेल्या एका एजन्सीची निवड केली आहे. शिंदे यांचे पत्र संचालक मंडळासाठी घरचा अहेर ठरले आहे. ३६० पदांच्या नोकर भरतीला मंजुरी मिळून अठरा महिन्यांचा कालावधी उलटला. मात्र चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची नोकर भरती होऊ शकली नाही.

तक्रारी, कायदेशीर प्रक्रिया यात नोकर भरतीचे घोडे अडले आहे. त्यामुळे संचालकांत अस्वस्थता वाढली आहे. नोकर भरतीच्या अडवणुकीचे खापर एकमेकांवर फोडणे सुरू आहे. त्यातूनच संचालकांत आपसी वादसुद्धा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शिंदे यांनी यापूर्वी बॅंकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद भूषविले आहे. जवळपास वीस वर्षांपासून ते बॅंकेचे संचालक आहे.

यापूर्वी सुद्धा ३१ ऑगस्ट २०२१ रोजी त्यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी तो स्वीकारला गेला नाही. त्यांची समजूत काढण्यात आली. दरम्यान आता शिंदे यांनी बॅंकेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ३१ ऑगस्ट २०२३ रोजी एक पत्र पाठविले. यात कायदेशीर प्रक्रियेत नोकरभरती विनाकारण लांबत आहे. बॅंकेचे सात लाख ६६ हजार खातेदार आहेत. ८२ शाखा, ११ पे-ऑफिस, एक मुख्यालय आणि चार विभागीय कार्यालयातून ग्राहकांना सेवा दिली जाते.

Ravindra Shinde, Chandrapur District Central Co-operative Bank
Chandrapur District Bank Recruitment: नोकरभरतीसाठी निवडली वादग्रस्त एजन्सी, सहकार आयुक्तांच्या पत्राला केराची टोपली !

कर्मचारी आणि अधिकारी अपुरे पडत असल्यामुळे बॅंकेच्या आर्थिक व्यवहार आणि दैनंदिन कामावर विपरीत परिणाम होत आहे. आरबीआय, नाबार्ड आणि सहकार खात्याच्या मापदंडानुसार बॅंक काम करण्यास असमर्थ ठरत आहे. सहकार खात्याच्या २३ ऑगस्ट २०२३ च्या परिपत्रकानुसार राज्यभरातील सहकारी बॅंकांमध्ये आयबीपीएस किंवा टीसीएस संस्था नोकर भरतीची प्रक्रिया राबवीत आहे.

या दोन्ही संस्था त्यांच्या पारदर्शकतेसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे न्यायालयीन (Court) प्रक्रियेत बॅंकेचा वेळ, पैसा वाया न घालविता शासन निदेशांचे पालन करावे. अन्यथा भविष्यात महाराष्ट्र (Maharashtra) राज्य सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७९(१) च्या तरतुदीनुसार कार्यवाहीला सामोरे जावे लागेल, असा इशाराही शिंदे यांनी दिला. राजीनामा दिला आहे. तो स्वीकारला अथवा नाही, याची आपल्याला कल्पना नाही, असे शिंदे यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले.

Ravindra Shinde, Chandrapur District Central Co-operative Bank
Chandrapur Congress News : कॉंग्रेस जिल्हाध्यक्षांनी हाणून पाडला आमदार धानोरकरांना एकटं पाडण्याचा प्रयत्न!

टीसीएसचा बॅंकेला प्रतिसाद..

चंद्रपूर (Chandrapur) जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने जेएसआर एक्झामिशन या एजन्सीची नोकर भरती प्रक्रिया राबविण्यासाठी निवड केली. या एजन्सीची यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील नोकर भरती प्रकरणात चौकशी सुरू आहे.

दरम्यान सहकार खात्याने राज्यभरातील बॅंकांना त्यांनी तयार केलेल्या तालिकेतील एजन्सीकडून भरती प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले. या निर्णयाला चंद्रपूर जिल्हा बॅंकेने न्यायालयात आव्हान दिले. याप्रकरणी २२ जून २०२३ रोजी जेएसआरबाबात पडताळणीचे निर्देश न्यायालयाने दिले.

बॅंकेने शासनाकडे प्रस्ताव पाठविला. परंतु तो शासनाने तपासला नाही. न्यायालयाने बॅंकेला टीसीएस आणि आयबीपीएस या दोन्ही कंपन्यांशी संपर्क साधण्यास सांगितले. या दोन्ही कंपन्यांचे दर जास्त असल्याचे बॅंकेकडून न्यायालयात सांगितले.

दरम्यान बॅंकेच्या संपर्काला टीसीएसने प्रतिसाद दिला. त्यांनी आपले दर कळविले आहे. नोकरभरतीचे शुल्क उमेदवारांकडून आकारले जाते. त्यामुळे बॅंकेवर याचा भुर्दंड बसणार नाही आणि टीसीएसकडून पारदर्शक नोकर भरती प्रक्रिया राबविली जाईल.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com