Chandrapur Congress News : प्रकाश देवतळे यांची फेरनियुक्ती, नाना पटोलेंच्या समर्थकांवर विरोधक पडले भारी !

Nana Patole : नाना पटोले यांनी त्यांना तात्काळ निलंबित केले होते.
Prakash Devtale and Nana Patole
Prakash Devtale and Nana PatoleSarkarnama
Published on: 
Updated on: 

Chandrapur Congress Nana Patole News : चंद्रपूर बाजार समितीच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्यासोबत हातमिळवणी करून कॉंग्रेसच्या दुसऱ्या गटाला पराभवाची चव चाखायला लावली होती. (This development took place after Patole's opponents and supporters stormed Delhi)

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना तात्काळ निलंबित केले होते. पण नाना पटोलेंच्या ‘त्या’ आदेशाला सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी होल्डवर ठेऊन एक प्रकारे पटोलेंना इशारा दिल्याचे बोलले जात आहे.

पूर्वीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांची फेरनियुक्ती काँग्रेस महासचिव के. सी. वेणूगोपाल यांच्याकडून करण्यात आली आहे. या घडामोडींनंतर पटोलेंचे पक्षातील विरोधक त्यांच्यावर भारी पडत असल्याची कुजबुज सुरू झाली आहे. पटोलेंचे विरोधक आणि समर्थकांच्या दिल्ली वाऱ्यांनंतर ही घडामोड झाली.

नाना पटोले कुठेतरी बॅकफूटवर गेल्याचे सांगण्यात येत आहे. हे प्रकरण त्यावेळी चांगलेच गाजले होते आणि आजही धुमसत आहे. पटोलेंना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यासाठी एक गट सक्रिय झाला आहे. ही घडामोड म्हणजे त्या गटाचे पहिले यश मानले जात आहे.

Prakash Devtale and Nana Patole
Chandrapur News : राष्ट्रवादीला दणका देत ओबीसी नेते डाॅ. जिवतोडे जाणार भाजपमध्ये, फडणवीसांच्या उपस्थितीत प्रवेश !

देवतळेंनी ‘ते’ पत्र चोरल्याचा आरोप..

नाना पटोले यांनी प्रकाश देवतळे यांची ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी केली होती. त्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव के. सी. वेणुगोपाल यांनी या कारवाईसंदर्भात प्रदेशाध्यक्षांशी गोपनीय पत्र व्यवहार केला. त्या पत्राची प्रत केवळ राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांना पाठविली. दरम्यान हे गोपनीय पत्र देवतळे यांनी प्रदेश कार्यालयातून चोरून माध्यमांकडे पुरविले, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय यांनी पत्रकार परिषदेत केला.

चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी भाजपशी युती केली. विजयानंतर भाजप जिल्हाध्यक्षांसोबत नृत्य केले. या सर्व प्रकाराची दखल घेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवतळे यांना ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावरून हटवून चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (ऊर्फ) रामू तिवारी यांच्याकडे प्रभार सोपविला. या कारवाईनंतर काही पदाधिकाऱ्यांनी दिल्लीवारी करीत पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे आपले म्हणणे मांडले.

Prakash Devtale and Nana Patole
Chandrapur BJP Assembly Election: भाजपचा नवा डाव; मनसेच्या नेत्यालाच केलं वरोरा विधानसभेचा प्रमुख

संपूर्ण राज्यातील लोकसभा मतदार संघाचा आढावा प्रदेश कार्यालयातर्फे घेण्याचे ठरले. चंद्रपूर लोकसभेचा आढावा २ जून रोजी घेण्यात येणार होता. शहर जिल्हाध्यक्ष यांच्याकडे संपूर्ण लोकसभा मतदार संघाची माहिती नसल्याने तातडीने राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे यांची ग्रामीणचे प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून २९ मे रोजी नियुक्ती केली.

मात्र, याच दिवशी अखिल भारतील काँग्रेस कमिटीचे सचिव के. सी. वेणुगोपाल यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना पत्र पाठविले. पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांना या पत्राची प्रत पाठविण्यात आली आहे. हे पत्र गोपनीय असून, पक्षांतर्गत बाब आहे. परंतु, देवतळे यांनी मीच जिल्हाध्यक्ष म्हणून कायम असल्याचे दर्शविण्यासाठी प्रदेश कार्यालयातून पत्र चोरून माध्यमांकडे पुरविले, असे दत्तात्रय यांनी प्रदेश कार्यालयाची भूमिका मांडताना सांगितले.

Prakash Devtale and Nana Patole
Nana Patole News : स्वबळाची भाषा नाना पटोलेंना अडचणीची ठरतेय का?

येत्या एक-दोन दिवसांत प्रदेश कार्यालय कठोर कारवाई करणार असल्याचेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेला बाजार समितीचे (APMC) माजी सभापती दिनेश चोखारे, डॉ. सतीश वारजूकर, डॉ. विश्वास झाडे, विनोद अहीरकर, घनश्याम मुलचंदानी उपस्थित होते.

मी पत्र चोरले असेल, तर चौकशी करा..

गोपनीय पत्र मी चोरले, असा विनोद दत्तात्रय यांचा आरोप आहे. या काळात त्यांच्याच मते मी पदमुक्त अध्यक्ष आहे. तर, विनोद दत्तात्रय हे प्रदेश कमिटीवर कार्यरत आहेत. त्यांनी या चोरीचा तपास करावा. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या म्हणण्यानुसार मी ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावर आजही कायम आहे.

जिल्हाध्यक्षांची बदनामी केली म्हणून पक्षशिस्त समितीकडे तक्रार करणार आहे. ज्या बाजार समितीतून हे सर्व प्रकरण घडले. त्या समितीवर काँग्रेस (Congress) पक्षाचा सभापती विराजमान आहे, असे प्रकाश देवतळे या संदर्भात प्रतिक्रिया देताना म्हणाले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.