Chandrapur Politics : चंद्रपूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षाच्या निवडणुकीपूर्वीच घोटाळ्याची फाईल उघडणार?

Chandrapur District Bank Election : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अध्यक्ष कोण होणार याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. अध्यक्ष हा आमचाच होणार असा दावा महायुती आणि महाविकास आघाडीच्यावतीने केला जात आहे.
Chandrapur District Bank
Chandrapur District BankGoogle
Published on
Updated on

Nagpur News, 18 Jul : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अध्यक्ष कोण होणार याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. अध्यक्ष हा आमचाच होणार असा दावा महायुती आणि महाविकास आघाडीच्यावतीने केला जात आहे.

यासाठी युती आणि आघाडीच्यावतीने जुळवाजुळव सुरू असतानाच बँकेतील नोकर भरती घोटाळ्याची फाईल उघडली जात असल्याचे समजते. यातच भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पोलिस महासंचालकांची भेट घेऊन या घोटाळ्याचा तपास सीआयडीमार्फत करण्याची मागणी केली आहे.

त्यामुळे अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या महाविकास आघाडीचे संचालक धास्तावले आहेत. चंद्रपूर जिल्हा बँकेच्या 21 संचालकपदासाठी नुकतीच निवडणूक पार पडली. 27 जुलैला अध्यक्ष निवडण्यात येणार आहे. नोकर भरती घोटाळ्याच्या कार्यकाळात संतोष रावत हे बँकेचे अध्यक्ष होते.

ते पुन्हा निवडून आले आहेत. याशिवाय महाविकास घाडीचे संदीप गड्डमवार, दोमोदर मिसार, तत्कालीन उपाध्यक्ष यशवंत दिघोरे आणि शेखर धोटे हेसुद्धा त्यावेळी संचालक होते. शेखर धोटे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. याशिवाय उद्धव ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख रवींद्र शिंदे हेसुद्धा संचालक मंडळात होते.

Chandrapur District Bank
Assembly Session : नंदुरबारच्या भूमाफियांना दणका, जमीन घोटाळ्यातील दोषींना थेट अटक करण्याचे आदेश

ते आठवडाभरापूर्वीच भाजपमध्ये दाखल झाले आहेत. तेसुद्धा यापूर्वी एक वर्षासाठी बँकेचे अध्यक्ष होते. निवडून आलेल्या संचालकांची संख्या अधिक असल्याचे अध्यक्षपदासाठी महायुतीचे पारडे जड दिसत आहे. असे असले तरी महाविकास आघाडीच्यावतीने कुठलीही गडबड होऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे.

यातच घोटाळ्याच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेली SIT पुन्हा सक्रिय झाली आहे. काही संचालकांना नोटीस पाठवण्यात येणार असल्याचे समजते. हे बघता बँकेचा अध्यक्ष बिनविरोध निवडून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चंद्रपूर जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर झाली तेव्हापासूनच अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत.

Chandrapur District Bank
Padalkar Awhad Clash : "गाडीत हत्यारं, आव्हाडांना मारण्याचा कट, माझ्याकडे पक्की माहिती..."; 'या' बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार आणि भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीतून माघार घेतली. चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर या बिनविरोध निवडून आल्या. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व माजी आमदार सुभाष धोटे यांचे बंधू शेखर धोटे यांनीही शेवटच्या क्षणी निवडणुकीतून माघार घेतली. बँकेची निवडणूक जिंकून आल्यानंतर उद्धव सेनेचे जिल्हा प्रमुख भाजपात सहभागी झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com