Chandrapur Crime News: धक्कादायक : काँग्रेस नेत्यावर गोळीबार ; चंद्रपुरात एका बुरखाधारक व्यक्तीनं..

Firing on Santosh Rawat: दुचाकीवरुन जात असताना अचानक गाडीतून आलेल्या हल्लेखोरांनी रावत यांच्या दिशेनं गोळीबार केला.
santosh rawat
santosh rawat Sarkarnama
Published on
Updated on

Chandrapur Firing on Santosh Rawat : चंद्रपूर शहरात काल (गुरुवारी) झालेल्या गोळीबारामुळे खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे नेते, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गोळीबार करण्यात आला. (chandrapur district central co operative bank president santosh rawat fired)

या गोळीबारातून ते थोडक्यात बचावले. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारात हा प्रकार घडला असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. संतोष रावत यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांच्या डाव्या हाताला गोळी लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत. गोळीबार करताच हल्लेखोरांनी गाडीतून पळ काढला.

santosh rawat
ShivSena SC Hearing : सत्तेसाठी आत्मा विकण्याचे धाडस यापुढे कोणी करणार नाही ; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला

गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हल्लेखोर स्विफ्ट डिझायर गाडीने ( MH 34 6152)आले होते. संतोष रावत हे सी.डी.सी.सी.बँकेसमोरुन दुचाकीवरुन जात असताना अचानक गाडीतून आलेल्या हल्लेखोरांनी रावत यांच्या दिशेनं गोळीबार केला.

santosh rawat
Delhi Govt Vs LG : दिल्ली केजरीवालांचीच ! ; न्यायालयाचा मोदींना दणका ; बदल्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार निवडून आलेल्या..

यात एक गोळी त्यांच्या हाताला स्पर्श करुन गेली, त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. एका बुरखाधारक व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे. हल्ल्यानंतर हल्लेखोर नागपूर मार्गे पसार झाले आहेत.

या हल्ल्याप्रकरणी संतोष रावत यांनी मुल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस तपास करीत आहेत. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या प्रकरणी सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात येत असून हल्ला करत असतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com