Chandrapur Bank Election : शेखर धोटे यांचा डाव त्यांच्यावर उलटला, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अनेक धक्के; धानोरकर-वडेट्टीवारांची एकी...

Background of Chandrapur District Central Cooperative Bank Election : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोकर भरती घोटाळा चांगलाच गाजला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सर्वच बड्या नेत्यांनी या निवडणुकीत उडी घेतली होती.
Chandrapur Bank Election
Chandrapur Bank ElectionSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. खासदार प्रतिभा धानोरकर बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. आता माजी आमदार आणि चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाष धोटे यांचे भाऊ तसेच बँकेचे माजी अध्यक्ष शेखर धोटे यांनी निवडणुकीतून माघार घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. या माघारीला पक्षनिष्ठा असे गोंडस नाव काँग्रेसने दिले आहे. असे असले तरी धोटे यांची राजकीय खेळी त्यांच्यावरच उलटली आहे. त्यांचे विरोधक बावणे हे बिनविरोध निवडूण आले आहेत.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोकर भरती घोटाळा चांगलाच गाजला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सर्वच बड्या नेत्यांनी या निवडणुकीत उडी घेतली होती. विजय वडेट्टीवार यांच्यासह भाजपचे चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून रंगत निर्माण केली होती. नंतर मात्र दोघांनीही निवडणुकीत आपला अर्ज मागे घेतला. या दरम्यान भाजपचे आमदार बंटी भांगडिया यांनी अनेकांना आपल्या गळाला लावले.

निम्मे संचालक बिनविरोध निवडून आले. त्यामुळे काँग्रेसची चांगली अडचण झाली. बँक हातून जाणार असल्याचे बघून खासदार प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांनी आपसातील वैर बाजूला ठेवले. एकमेकांच्या भेटी घेतल्या. एकीचा संदेश दिला. निवडणूक जिंकण्याचा निर्धार बोलून दाखवला. यातच शेखर धोटे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.

Chandrapur Bank Election
Assembly Election : नितीश कुमारांची महिलांसाठी सर्वात मोठी घोषणा; शिंदे-फडणवीस-पवारांच्या एक पाऊल पुढे…

कोरपना अ गटातून काँग्रेसचे व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शेखर धोटे आणि माजी अध्यक्ष विजय बावणे यांच्यात लढत होणार होती. बावणे यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी बरेच प्रयत्न झाले. मात्र त्यांनी कोणालाच दाद दिली नाही. लगतच्या वर्षातील अंकक्षेणावर घेतलेल्या आक्षेपामुळे बावणे यांची उमेदवारी रद्द झाली होती. त्यामुळे धोटे बिनविरोध निवडून येणार असेच चित्र होते.

Chandrapur Bank Election
Nishikant Dubey Controversy : दुबेंचा डाव आधी समजून घ्या, ही गरळ उगाच नाही; महाराष्ट्राला डिवचण्याची ही आहेत 3 कारणे...

धोटेंनीही ओबीसी प्रवर्गातून दाखल केलेली उमेदवारीसुद्धा मागे घेतली होती. मात्र बावणे यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली. त्यांनी निकालाला स्थगिती मिळवली. त्यामुळे धोटे यांचे स्वप्न भंग झाले. बावणे हेच आता बिनविरोध निवडून आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com