Local Body Elections : कुठले ‘वार' ठरणार भारी? मुनगंटीवार, वडेट्टीवार, जोरगेवारांनी लावली फिल्डींग...

Political Heat Rises in Chandrapur Local Body Elections : काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजय मिळवला. त्यापूर्वी त्यांचे चंद्रपूरच्या खासदारांसोबत मोठे वाद झाले होते.
"Chandrapur’s top political leaders — Sudhir Mungantiwar, Vijay Wadettiwar, and Kishor Jorgewar — seen strategizing ahead of local body elections."
"Chandrapur’s top political leaders — Sudhir Mungantiwar, Vijay Wadettiwar, and Kishor Jorgewar — seen strategizing ahead of local body elections."Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे चंद्रपूर जिल्ह्यातील दोन बडे नेते मानले जातात. दोघांनीही विधानसभेच्या निवडणुकीत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. बडे नेते विरोधात असतानाही भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरमध्ये आपली ताकद दाखवून दिली. आता नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीत ते आपल्या कार्यकर्त्यांसाठी काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री असतानाही मुनगंटीवार यांच्यावर सध्या भाजप नाराज आहे. त्यांचा मंत्रिमंडळातही समावेश केला नाही. यात संघटनेतील त्यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपचे नेते सध्या त्यांच्यापासून अंतर राखून आहेत. त्यांच्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील मूल आणि बल्लारपूर नगरपरिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे.

यापूर्वीच 16-17 मध्ये नगराध्यक्षपदासाठी झालेल्या थेट निवडणुकीत भाजपचे उमेदवार निवडून आले होते. या मतदारसंघात काँग्रेस नावालाच आहे. त्यांची संघटनात्मक स्थिती फार काही चांगली नाही. नेतृत्वाचा अभाव आणि आपसांतील मतभेदांमुळे मुनगंटीवारांना येथे फार अडचण दिसत नाही. गतवेळी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजू झोडे यांनी भाजपच्या उमेदवाराला विजयासाठी चांगलेच झुंजवले होते. हे बघता मुनगंटीवारांना बेसावध राहून चालणार नाही.

"Chandrapur’s top political leaders — Sudhir Mungantiwar, Vijay Wadettiwar, and Kishor Jorgewar — seen strategizing ahead of local body elections."
Maharashtra government : रहिवासी क्षेत्रासाठी तुकडेबंदी कायदा रद्द; शुल्काबाबतही मोठा निर्णय, कुणाला, कसा होणार फायदा?

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजय मिळवला. त्यापूर्वी त्यांचे चंद्रपूरच्या खासदारांसोबत मोठे वाद झाले होते. विषय जातीवरसुद्धा गेला होता. त्यांच्या मतदारसंघातील ब्रम्हपुरी नगरपरिषदेत काँग्रेसच्या रिता उराडे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत थेट जनतेतून निवडून आल्या होत्या. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

वडेट्टीवारांच्या जवळच्या अनेक कार्यकर्त्यांनीसुद्धा भाजपला जवळ केले आहे. त्यामुळे येथील राजकीय समीकरण थोडे विस्कटले आहे. हे बघता वडेट्टीवारांना येथे चांगलीच मशागत करावी लागणार असल्याचे दिसून येते. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्यावर भाजपने शहराची जबाबदार टाकली आहे. त्यांच्या समर्थकांना शहराध्यक्ष केले आहे. त्यामुळे आता त्यांची जबाबदारी आणखी वाढली आहे.

"Chandrapur’s top political leaders — Sudhir Mungantiwar, Vijay Wadettiwar, and Kishor Jorgewar — seen strategizing ahead of local body elections."
Rahul Gandhi on Sarkar Chori : हरियाणासह महाराष्ट्रात ‘सरकार चोरी’ची अशी होती व्यवस्था; राहुल गांधींचे धक्कादायक खुलासे

घुग्गुस नगर परिषद जोरगेवारांसाठी प्रतिष्ठेची राहणार आहे. घुग्गुसने विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा दिला होता. इथे काँग्रेसचे मताधिक्य अधिक आहे. हे बघता ही नगरपरिषद भाजपकडे खेचून आणून पक्षाचा पहिला नगराध्यक्ष बसवण्यासाठी जोरेगवारांसमोर आव्हान राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com