Pratibha Dhanorkar Congress : खासदार धानोरकरांनी सत्तेत न येण्याचं कारण सांगत तक्रार; 'घरभेदी' काँग्रेस पदाधिकाऱ्यांची 'पुरती गाळण'

Chandrapur Pratibha Dhanorkar Complains Against Anti-Party Congress Leaders in Yavatmal : यवतमाळ काँग्रेस मेळाव्यात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी काँग्रेसविरोधात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची तक्रार केली.
Pratibha Dhanorkar Congress
Pratibha Dhanorkar CongressSarkarnama
Published on
Updated on

Congress internal conflict : चंद्रपूर जिल्ह्यातील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी काँग्रेस सत्तेत न येण्याचं कारण सांगताना, त्यांनी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार केली.

खासदार धानोरकर यांनी थेट मेळाव्यात ही तक्रार केल्याने पक्षविरोधी कारवाया करणारे पदाधिकारी कोण, याची चर्चा संपूर्ण विदर्भात रंगली आहे. खासदार धानोरकर यांच्या या तक्रारीनंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात, याकडे आता लक्ष लागलं आहे.

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी काँग्रेसमध्ये अनेक पदाधिकारी पद घेऊन बसलेत, निवडणुका आल्या की, पक्षाविरोधात ते काम करतात. काहींना भाजपचा (BJP), तर काहींना शिवसेनेचा पुळका येतो. अशाना पदमुक्त करा, अशी थेट मागणी यवतमाळ इथल्या आढावा बैठकीत केली.

पक्षात गटबाजी करणाऱ्यांचा समाचार घेताना, खासदार धानोरकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत इतर पक्षाचे उमेदवार निश्चित होऊन ते कामाला देखील लागलेत. मात्र काँग्रेसमध्ये (Congress) वेळ निघू जाईपर्यंत उमेदवार ठरत नाही. परिणामी त्याचा फटका काँग्रेसला बसतो, अशीही तक्रार खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली.

Pratibha Dhanorkar Congress
Narendra Modi foreign awards : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा किती देशात झालाय सन्मान...

खासदार धानोरकर यांनी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या पदाधिकाऱ्यांविरोधात थेट आढावा बैठकीत तक्रार केल्याने, त्याची कुजबूज पक्षात आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ किंवा पक्षश्रेष्ठी धानोरकर यांच्या तक्रारीची दखल घेणार का? पक्षविरोधी कारवाया करणारे का आहेत? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी काँग्रेस करणार का? अशी चर्चा रंगली आहे.

Pratibha Dhanorkar Congress
Gujarat riots 2002 Modi : गुजरात हत्याकांडावेळी मोदींनी राजीनामा दिला का? सीएम सिद्धरामय्या यांचं भाजपला जोरदार प्रत्युत्तर

विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसची संपूर्ण महाराष्ट्रात बॅगफूटला गेले आहे. यात विदर्भात विधानसभेच्या 62 जागा होत्या. यात काँग्रेसला अवघ्या आठ जागा जिंकता आल्या आहेत. यामुळे काँग्रेसमध्ये मरगळ आली आहे. ही मरगळ दूर करण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे. हेच प्रयत्न होताना दिसत नाही, तेच खासदार धानोरकर यांनी तक्रार केल्याने काँग्रेसची अधिकच अडचण झाली आहे.

काँग्रेस राज्यात सैरभैर

लोकसभा निवडणुकीत विदर्भातील 10 लोकसभा मतदारसंघापैकी भाजप दोन आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एक जागा मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतून काँग्रेसने दमदार कामगिरी केली होती. तुलनेत ही कामगिरी विधानसभेत घसरली. परिणामी, काँग्रेस सध्या राज्यात सैरभैर झाली आहे. अनेक काँग्रेस नेते, पदाधिकाऱ्यांनी सत्ताधारी महायुतीमधील पक्षांकडे धाव घेत आहेत. याचा सर्वाधिक फटका काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला बसला आहे.

काँग्रेसला महाग पडू शकतं

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही गळती रोखायची आहे. यातच प्रतिभा धानोरकर यांनी केलेली तक्रार मोठी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने, या तक्रारीकडे काँग्रेस पक्षाला दुर्लक्ष करता येणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com