Chandrashekhar Bawankule : पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या कशामुळे रखडल्या? बावनकुळेंनी सांगितलं कारण; अजितदादा...

Chandrashekhar Bawankule on guardian minister: गोंदिया, भंडारा. चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील एका एकही आमदार मंत्रिमंडळात नाही. त्यामुळे येथे पालकमंत्री बाहेरच्याच जिल्ह्यातील मंत्र्यांना नियुक्त करावे लागणार आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता पालकमंत्र्यांची नियुक्ती हा सर्वाधिक चर्चेचा विषय झाला आहे. अनेक मंत्र्याना आपल्या आवडत्या जिल्ह्याचे पालकमंत्री व्हायचंय आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात पालकमंत्री नियुक्त करताना महायुती सरकारला मोठी कसरत करावी लागणार आहे. याच कारणांमुळे पालकमंत्र्यांची नियुक्ती रखडली असल्याचे बोलले जात आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मागचे खरे कारण सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार विदेशात गेले होते. त्यामुळे चर्चा थांबली होती. पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या लवकरच जाहीर केल्या जातील, असे त्यांनी सांगितले. कदाचित आजच चर्चा होईल अशीही शक्यता त्यांनी वर्तविली.

Chandrashekhar Bawankule
Walmik karad : वाल्मिक कराडसोबत फोटो काढणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला दणका; आव्हाडांच्या आक्षेपानंतर मोठी कारवाई

परभणीतील गुंडगिरी मोडून काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारावे, अशी मागणी स्थानिक आमदारांच्यावतीने केली जात आहे. दुसरीकडे फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून महूसलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याच गळ्यात पुन्हा माळ पडण्याची दाट शक्यता आहे.

Chandrashekhar Bawankule
Maharashtra Congress : जागो काँग्रेस! MVA तील मित्रपक्षांमुळे मोठी संधी, तरुण नेते सोने करणार का?

फडणवीस व बावनकुळे यांच्याशिवाय नागपूर जिल्ह्यात दुसरा पालकमंत्री कोणी नाही. विदर्भातील गोंदिया, भंडारा. चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील एका एकही आमदार मंत्रिमंडळात नाही. त्यामुळे येथे पालकमंत्री बाहेरच्याच जिल्ह्यातील मंत्र्यांना नियुक्त करावे लागणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात तीन मंत्री आहेत. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा येथे प्रत्येकी एक मंत्री आहे. हे बघता येथे मोठा वाद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अमरावती जिल्हासुद्धा मंत्र्याविना आहे. शेजारच्या अकोला जिल्ह्यात आकाश फुंडकर मंत्री आहेत. २६ जानेवारीला पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रत्येक जिल्ह्यात झेंडा फडकावला जातो. हे बघता २६ तारखेपूर्वी पालकमंत्र्यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे यापूर्वी आघाडीच्या काळात स्थानिक नेत्यांना पालकमंत्री करण्यात आले नव्हते. त्यांना वेगवेगळ्या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे मोठे वादही निर्माण झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com