Chandrashekhar Bawankule : सत्तास्थापनेसाठी अचलपूरमध्ये 'अजब' समीकरण? भाजप-एमआयएम युतीच्या चर्चांवर चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं...

BJP AIMIM Alliance News Maharashtra: अचलपूरमधील सत्तास्थापनेच्या चर्चांवर चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजप-एमआयएम युतीबाबत स्पष्ट भूमिका मांडली.
 Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule Sarkarnama
Published on
Updated on

अचलपूर नगरपरिषदेत सत्तास्थापनेसाठी सध्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे. विशेषतः भाजप आणि एमआयएम यांच्यात संभाव्य युतीच्या चर्चा सुरु असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या चर्चांवर आपली भूमिका स्पष्ट शब्दांत मांडली आहे.

अमरावतीच्या अचलपूरमध्ये आपले-आपले गट स्थापन केले आहे. भाजपच्या गटात एमआयएम (AIMIM) आणि काँग्रेस नाही. त्यांनी गट करून सभापती वाटून घेतले आहे. शिवाय भाजप एमआयएमला कधीही सोबत घेणार नाही. आमचा कुठलाही पाठिंबा एमआयएमला नाही. एमआयएमसोबत युती होणार असल्याच्या चर्चांना त्यांनी केवळ अफवा असल्याचे सांगत फेटाळून लावले.

 Chandrashekhar Bawankule
Mangesh Chavan Politics: आमदार मंगेश चव्हाण यांचा चाळीसगांवसाठी गुंतवणुकीचा मास्टरस्ट्रोक, दावोसमध्ये झाला मोठा करार!

स्थानिक पातळीवर काही नेते आणि कार्यकर्ते विविध शक्यता मांडत असले, तरी भाजपचा निर्णय संघटना आणि विचारधारेनुसारच घेतला जाईल, असे बावनकुळे म्हणाले. भाजप हा राष्ट्रवादी विचारांचा पक्ष असून, जनतेच्या विश्वासावरच सत्तास्थापन करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे केवळ आकडेमोडीसाठी विचारसरणीशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

अचलपूरच्या राजकारणात सध्या अपक्ष आणि लहान पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. निवडणूक निकालानंतर कोणाला सत्ता मिळणार, याबाबत अद्याप चित्र स्पष्ट नाही. याच अनिश्चिततेतून विविध युतींच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र भाजप आपली स्वतंत्र ताकद वाढवण्यावरच भर देत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

 Chandrashekhar Bawankule
Jalgaon Mayor Politics: जळगावच्या महिला महापौर भाजपच्याच, उपमहापौर कोण? एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळेल कासंधी?

दरम्यान, अचलपूरमध्ये भाजप-एमआयएम युतीच्या चर्चांना पूर्णविराम देत चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे येत्या काळात अचलपूरच्या राजकारणात कोणते समीकरण आकाराला येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com