Mangesh Chavan Politics: आमदार मंगेश चव्हाण यांचा चाळीसगांवसाठी गुंतवणुकीचा मास्टरस्ट्रोक, दावोसमध्ये झाला मोठा करार!

Chalisgaon MLA news: दावोस येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चाळीसगावसाठी १५ हजार कोटींच्या एसएएफ प्रकल्पाचा सामंजस्य करार
Mangesh Chavan with CM Devendra Fadnavis at DAVOS
Mangesh Chavan with CM Devendra Fadnavis at DAVOSSarkarnama
Published on
Updated on

Foreign investment in Chalisgaon: दावोसच्या परिषदेत चाळीसगावसाठी एक महत्त्वाचा निर्णय झाला आहे. आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नाने या मतदारसंघात १५ हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. त्याबाबतचा करार मुख्यमंत्र्यांनी केला.

चाळीसगाव – महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि हरित ऊर्जेच्या भविष्याला नवी दिशा देणारा ऐतिहासिक क्षण दावोस (स्वित्झर्लंड) येथे घडला. जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात विविध गुंतवणूक करार झाले. एसएएफ प्रकल्पासाठी अमेरिकेतील अॅक्च्युअल एचक्यू कंपनी चाळीसगावला प्रकल्प उभारणार आहे.

या दौऱ्यात चाळीसगाव तालुक्यात मोठा उद्योग यावा यासाठी प्रयत्न सुरू होते. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला नवा बाजार मिळावा आणि हजारो युवकांना रोजगार मिळावा या उद्देशाने आमदार मंगेश चव्हाण देखील दावोस येथे उपस्थित होते. ते त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होते, असे त्यांनी सांगितले.

Mangesh Chavan with CM Devendra Fadnavis at DAVOS
Jalgaon Mayor : जळगावात महापौर पदाच्या खूर्चीवर महिलाच बसणार, 'या' दोघींपैकी एक नाव जवळपास फिक्सच होणार

या कंपनीसोबत चाळीसगाव येथे सुमारे १५ हजार कोटींच्या सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल (SAF) प्रकल्पाचा सामंजस्य करार करण्यात आला. शेतीतील टाकाऊ अवशेषांपासून विमानांसाठी वापरल्या जाणाऱ्या हरित इंधनाची निर्मिती त्यात होईल. देशातील मोजक्या आणि जागतिक दर्जाचा महाप्रकल्प आहे.

Mangesh Chavan with CM Devendra Fadnavis at DAVOS
Girish Mahajan : भाजपवर कुरघोडी करणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेत सहभागी करणार का? गिरीश महाजन स्पष्टच बोलले...

राज्यात मोठी गुंतवणूक यावी, नव्या उद्योगांना चालना मिळावी त्यासाठी हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्यातून तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होईल. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दावोस येथे उद्योगजगताशी चर्चा केली.

वर्षभरापूर्वीच त्यांनी चाळीसगांव येथे मोठा उद्योग येणार, अशी चर्ता होती. त्याबाबत बोलणी अंतिम टप्प्यात असून येणारी गुंतवणूक किती मोठी असेल याचा अंदाज देखील कुणी करू शकत नाही, असे सूतोवाच आमदार चव्हाण यांनी केले होते. ते आता कृतीत उतरले आहे.

या प्रकल्पाअंतर्गत चाळीसगांव येथे १५ हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ऊस पाचट, कापूस काड, सोयाबीन भूसा, तूर काड, बागायती अवशेष अशा कृषी अवशेषांपासून सस्टेनेबल एव्हीएशन फ्यूल तयार केले जाणार आहे. तो २०२९ पर्यंत टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होईल.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प येत आहे. परिसरासाठी रोजगार, शेतकरी उत्पन्न आणि पर्यावरण संरक्षण या दृष्टीने तो महत्त्वाचा आहे. आमदार चव्हाण यांचे राजकीय नेतृत्व त्यातून अधिक भक्कम होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com