Kamthi Politics : बावनकुळेंच्या मतदारसंघात बंडखोरी कायम; मात्र भाजपला विड्रॉलसाठी आणखी एक संधी

Kamthi municipal election : विधानसभेच्या निवडणुकीत बावनकुळे कामठी विधानसभा मतदारसंघातून चार वेळा मोठ्या फरकांनी निवडून आले आहेत. मात्र कामठी शहरातून त्यांना आजवर आघाडी घेता आली नाही. मुस्लिम आणि अनुसूचित जाती जमातीची लोकसंख्या या भागात जास्त आहे. माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे यांचेही या शहरात वर्चस्व आहे.
Chandrashekhar Bawankule
Supporters gather in Kamthi as multiple candidates gear up for a heated municipal election battle. The political tension highlights the rising rebellion in Bawankule’s constituency.Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 22 Nov : भाजपचे नेते आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आपल्याच मतदारसंघातील बंडखोरी टाळू शकले नाहीत. भाजपला कामठी नगर पालिकेत काँग्रेससह माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांच्या बहुजन रिपब्लिकन एकता मंचनेही आव्हान दिले आहे.

नगराध्यक्षपदासाठी येथून कोणीच माघार घेतली नाही. मात्र येथील एका उमेदवाराने छाननीच्या निर्णयाला कोर्टात आव्हान दिले होते. त्यामुळे आणखी दोन दिवस उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सर्वांना मिळाली आहे. ही संधी भाजपसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

विधानसभेच्या निवडणुकीत बावनकुळे कामठी विधानसभा मतदारसंघातून चार वेळा मोठ्या फरकांनी निवडून आले आहेत. मात्र कामठी शहरातून त्यांना आजवर आघाडी घेता आली नाही. मुस्लिम आणि अनुसूचित जाती जमातीची लोकसंख्या या भागात जास्त आहे. माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे यांचेही या शहरात वर्चस्व आहे.

Chandrashekhar Bawankule
Jamner election controversy : माघारीसाठी हायव्होल्टेज ड्रामा; भाजपच्या भीतीने महिला उमेदवारांनी चक्क घर सोडले!

काँग्रेसचे नेते सुनील केदारांनाही मानणारा मोठा वर्ग येथे आहे. हे शहर आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपला मोठी कसरत करावी लागणार आहे. असे असताना जागा वाटपावरून सुलेखा कुंभारे आणि भाजपची बोलणी फिसकटली आहे. नगराध्यक्षपदाच्या बदल्यात कुंभारे सहा नगरसेवकाच्या जागा भाजपकडे मागितल्या होत्या. त्यांची मागणी भाजपने फेटाळून लावली. भाजपने सर्व जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आणि अजय अग्रवाल यांना नगराध्यक्षपदाचे उमेदवार घोषित केले.

अग्रवाल व्यावसायिक आहेत. त्यांचा थेट भाजपशी संबंध नाही. मात्र, बावनकुळे तसेच भाजपच्या काही बड्या नेत्यांसोबत त्यांची उठबस आहे. त्यांना नगराध्यक्षपदाचे उमेदवार केल्याने भाजपचे कार्यकर्ते दुखावले आहेत. दुसरीकडे कुंभारे यांनी संजय कदमांना मैदानात उतरवले आहे. याशिवाय काँग्रेसचे शकूर नगानी यांचेही आव्हान भाजपला मोडून काढावे लागणार आहे.

Chandrashekhar Bawankule
Sayaji Shinde : गिरीश महाजनांच्या वाटेत आता अभिनेते सयाजी शिंदे आडवे, कुंभमेळ्यावरुन तापलं नाशिक

शकूर नगानी माजी नगराध्यक्ष आहेत. परिचित चेहरा आहे. काँग्रेस आणि मुस्लिम व्होट बँक त्यांच्याकडे आहे. असे असले तरी शाजा भाई यांनी काँग्रेस तिकीट देणार नाही या शंकेने आधीच अजित दादांचे घड्याळ हाती बांधले आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. हे बघता भाजप आणि काँग्रेस या दोघांनाही मत विभाजनाचा धोका निर्माण झाला आहे.

काँग्रेसचे उमेदवार शकूर नगानी यांचे भाचे आसिफ सरमतिया यांनीही उमेदवारी दाखल केली होती. त्यांचा अर्ज छाननीत फेटाळण्यात आला होता. मात्र त्यांनी कोर्टात धाव घेतली. कोर्टाने त्यांचा अर्ज स्वीकारण्याचा आदेश दिला असल्याने कामठी नगरपालिकेत उमेदवार अर्ज मागे घेण्यासाठी २५ नोव्हेंबर ही मुदत देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com