Chandrashekhar Bawankule News : भाग पाडलं तर कायदा हातात घेऊ, अन् मुंबईत 'ईट का जवाब पत्थर से...' देऊ !

BJP : त्यांनी मर्यादा ओलांडली तर भारतीय जनता पक्ष आपली मर्यादा सोडेल.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama

Nagpur Political News : आम्हाला वाटतं की महाराष्ट्र शांत रहावा. महाराष्ट्रात कोणती अनुचित घटना घडू नये. महाराष्ट्रात आमचं सरकार असल्याने कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नये, असं वाटतं. जर त्यांनी मर्यादा ओलांडली तर भारतीय जनता पक्ष आपली मर्यादा सोडेल. त्यांनी भाग पाडलं तर मुंबईत मात्र ‘ईट का जवाब पत्थर से...’ देऊ, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. (Devendra Fadnavis did a work that will be recorded in history)

आज (ता. २८) सकाळी नागपुरात आमदार बावनकुळे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मी कुणाला इशारा देऊ इच्छित नाही, पण ते लोक ज्या पद्धतीने वागत आहे, ते त्यांनी सोडावे. मुख्यमंत्रिपदाची धुरा सक्षमपणे सांभाळत इतिहासात नोंद होईल, असे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले आणि महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेच्या मनात जी उंची गाठली आहे, ती उंची कधीच कमी होऊ शकत नाही.

उद्धव ठाकरे जन माणसातून मोठे झाले नाही तर सोन्याच्या चमच्याने बदामाचे दूध पिऊन मोठे झालेले आहेत. अडीच वर्षे सरकार चालवून देवेंद्र फडणवीसांसारखी उंची मी गाठू शकलो नाही असं उद्धव ठाकरे यांना वाटत असेल म्हणून गलिच्छ भाषेत, खालच्या स्तरावर जाऊन ते फडणवीसांबाबत बोलत आहेत. असं करून त्यांची उरली सुरली उंचीही ते कमी करून घेत आहेत, अशी टिका आमदार बावनकुळेंनी केली.

तुम्ही अशा नेतृत्वाचे जेवढे अपमान कराल ते नेतृत्व तेवढेच मोठे होत जाणार. ज्या देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना भावाप्रमाणे प्रेम दिलं त्यांना हवे ते निर्णय करून दिले. मात्र सरकार गेल्याने सैरभैर झालेल्या उद्धव ठाकरे ना माहीत आहे की ते पुन्हा आता कधीच सत्तेत येणार नाहीत, त्यामुळे ते देवेंद्र फडणीस यांच्याबद्दल अशा पद्धतीने बोलत असल्याचे ते म्हणाले.

Chandrashekhar Bawankule
Bawankule on Anil Deshmukh : अनिल देशमुख सध्या जमानतीवर बाहेर आहेत, त्यांनी ‘ऑर्डर’ नीट वाचली नाही, असं वाटतंय !

आता एखाद्या वेळी एवढा मोठा उद्रेक होईल की मुंबईमध्ये त्याचे पडसाद उमटतील आणि आम्हीही ते रोखू शकणार नाहीत. त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही, असेही बावनकुळे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) जपानला कशासाठी गेले उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पंधरा दिवस आराम करण्यासाठी गेले होते. कालच्या बीडच्या सभेत अजितदादांनी (Ajit Pawar) दुष्काळासंदर्भात आपले म्हणणे मांडले. आपण काय करतो आहोत, याची माहिती देण्यासाठी सभा घ्याव्या लागतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस सर्वज जण राज्यातील शेतकऱ्याकडे लक्ष ठेवून आहेत.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com