Chandrasekhar Bawankule : '..तरी महायुतीच्या उमेदरावारांचा विजय निश्चित' ; बावनकुळे यांचं शाह, फडणवीसांसमोर वक्तव्य!

Chandrasekhar Bawankule On Mahayuti : अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी विदर्भ विभागाची कार्यकर्ता संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती.
Chandrasekhar Bawankule
Chandrasekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Vidhan Sabha Election 2024 : लोकसभेच्या निवडणुकीत विदर्भात भाजपला मोठा धक्का बसला आहे. दहा पैकी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासह फक्त दोनच खासदार निवडून आले आहे. पराभव कसा झाला, पक्ष कुठे कमी पडला, काय चुका झाला आणि विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी पक्षातर्फे काय काय उपाययोजना करण्यात येत आहे, याचा लेखाजोखा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज(मंगळवारी) भाजपचे नेते तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सादर केला.

विदर्भात महाविकास आघाडीपेक्षा पाच लाख मते महायुतीला कमी पडल्याचे सांगून त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून याची भरपाई होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच प्रत्येक बुथवर २० मते अधिकची मिळाली तरी मोठ्या प्रमाणात महायुतीचे उमेदवार विजयी होऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.

Chandrasekhar Bawankule
Devendra Fadnavis : 'महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे कायम राहिले असते, तर...' ; फडणवीसांचं वक्तव्य!

अमित शाह(Amit Shah) यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी विदर्भ विभागाची कार्यकर्ता संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह, राज्याचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव, रावसाहेब दानवे, नागपूर जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख कैलाश विजयवर्गीस यांच्यासह विदर्भातील प्रमुख नेते उपस्थित होते.

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे(Chandrasekhar Bawankule) यांनी विदर्भातील बुथची संख्या, प्रत्येक बुथवर महायुतीच्या उमेदवाराला मिळालेली मते याची माहिती दिली. विदर्भात एकूण  २१ हजार ८४७ बूथ असून महायुतीला ५४ लाख ४९ हजार मते मिळाली. विरोधकांच्या तुलनेत पाच लाख मते कमी मिळाली आहेत.

आता ए.बी.सी. अशा तीन श्रेणींमध्ये बुथचे विभाजन करण्यात आले आहे. ए श्रेणीच्या बुथवर सर्वाधिक मते महायुतीच्या उमेदवाराला, बी मध्ये पन्नास टक्के आणि सी श्रेणीच्या बुथवर सरासरी तीस टक्के मते मिळाली आहेत. कमी मते मिळालेल्या बुथवर सर्वाधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर शंभर दिवसांत घेतलेल्या निर्णयाची माहिती सर्व मतदारांपर्यंत पोहचवण्यात आली.

Chandrasekhar Bawankule
Sushma Andhare : सुषमा अंधारेंची पुण्यातील 'या' मतदारसंघासाठी जोरदार 'फिल्डिंग'?

महायुतीने शेतकऱ्यांना दिलेली वीज माफी, लाडकी बहीण योजनांचा प्रचार केला जात आहे. अधिकाधिक लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न भाजप(BJP) कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केला जात आहे. विदर्भातील बुथचा विचार करता एका बुथवर सरासरी २० मतांची भर पडली तरी महायुतीचा उमेदवार निवडून येऊ शकतो असे बावनकुळे यांनी यावेळी अमित शाह यांना सांगितले.

२० मतांची भरपाई एकटी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून होणार असल्याचेही ते म्हणाले. अमित शाह यांनी मात्र २० नव्हे तर प्रत्येक बुथवर १० टक्के मते वाढवण्याचा सल्ला यावेळी दिला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com