Bawankule News : आज कुणाचाही पक्ष प्रवेश नाही, नवनीत राणांना आम्ही सहयोगी म्हणून बोलावले आहे!

Bacchu Kadu : बच्चू कडू मागील काही काळापासून भाजपवर चांगलेच उखडलेले आहेत. आता बच्चू कडूंना भाजपचे प्रवक्ते उत्तर देणार आहेत.
Chandrashekhar Bawankule, Navneet Rana & Bacchu Kadu
Chandrashekhar Bawankule, Navneet Rana & Bacchu KaduSarkarnama

Bawankule News : अमरावतीच्या खासदार आगामी निवडणूक भाजपच्या साथीने लढवण्याच्या तयारीत आहेत. त्या भाजपमध्ये जाणार, अशा चर्चाही मध्यंतरी झडल्या. पण त्या भाजपमध्ये येणार नाहीत, असे सूतोवाच आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

नागपूर विमानतळावर आज सकाळी (ता. 4) आमदार बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, नवनीत राणांचा कुठलाही पक्ष प्रवेश नाही. नवनीत राणा यांच्यासह भाजपच्या सर्व मित्रपक्षांना आम्ही या संमेलनाला बोलावलं आहे.

नवनीत राणा यांनासुद्धा संमेलनाचे निमंत्रण दिले आहे. आज नागपुरात कोणताही पक्ष प्रवेश नाही सहयोगी म्हणून त्या येतील. प्रहारचे संस्थापक आमदार बच्चू कडूसुद्धा मागील काळात भाजपवर चांगलेच उखडलेले दिसले. यासंदर्भात विचारले असता, बच्चू कडूंना आमचे प्रवक्ते उत्तर देतील, असे बावनकुळे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chandrashekhar Bawankule, Navneet Rana & Bacchu Kadu
Chandrashekhar Bawankule : लहान पक्षातील कार्यकर्त्यांचे सहकार्य घेण्याबाबत बोललो

मोदी ब्रेकमध्येही भेटतात

पंतप्रधान नरे्ंद्र मोदी जेव्हाही ज्या ज्या विमानतळावर थांबतात आणि शॉर्ट पिरेड असला तरी आमचे बूथप्रमुख, केंद्रप्रमुख, तालुकाप्रमुख भजन मंडळ प्रमुख, सामाजिक संस्थांचे प्रमुख आदी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी मोदीजी संवाद साधतात.

नांदेडलाही 35 कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. साधारणतः पाच-सहा दौरे महाराष्ट्रातील बघितले तर साडेचारशेच्या वर कार्यकर्ते पदाधिकारी यांचा मोदींसोबत संवाद झालेला आहे. आम्हाला गौरव आहे मोदी कार्यकर्त्यांना भेटतात आणि कार्यकर्ते जेव्हा सांगतात की, आमच्या जीवनाचं सार्थक झालं, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

संमेलनात 30 हजार युवक

महाराष्ट्रातला जवळपास 60 हजारच्या वर युवक आणि विदर्भात 30 हजार, असं एक लाख युवकांचं संमेलन आहे. नमो युवा संमेलन आहे. राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या अतिव्यस्त बैठकांमुळे आज ते नमो युवा संमेलनाला येऊ शकले नाहीत, परंतु स्मृती इराणी ज्या आमच्या फायर ब्रँड नेत्या आहेत, त्या येणार आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तेजस्वी सूर्या हे नमो संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. या संमेलनामधून विकसित भारताचा जो संकल्प मोदीजींनी केला, त्याला साथ देणार आहेत.

Chandrashekhar Bawankule, Navneet Rana & Bacchu Kadu
Bawankule On Congress : बावनकुळे म्हणतात, 'काँग्रेस भ्रष्टाचारी पण मोदींवर दहा वर्षांत एकही डाग...'

शिंदे, फडणवीस, पवार सीट वाटप ठरवतील

केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आता होईल. महाराष्ट्रातील पदाधिकारी जेव्हा आपलं मत मांडायला जातील आणि महाराष्ट्राचा क्रमांक जेव्हा येईल तेव्हा महायुतीचे जागावाटप होईल. त्यानंतर महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर होईल.

प्रत्येकाला आपापल्या जागा मागण्याचा अधिकार आहे. परंतु जेव्हा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सोबत बसतील आणि त्यानंतर जागांचे वाटप होईल, तेच अंतिम असणार आहे.

प्रत्येक पक्षाने जागांची मागणी करणे, स्वाभाविक आहे. शेवटी निवडणुकीमध्ये निवडून येणे हा महत्त्वाचा विषय असतो. निवडून येण्याकरिता काय काय करावे लागेल, त्यातून निर्णय होतील आणि मग विषय पुढे जाईल, असे बावनकुळे म्हणाले.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर झाली आहे. त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा आहेत, याबद्दल विचारले असता, छोट्या बालकालासुद्धा कळतं महाराष्ट्रातील कुठलीही सीट जाहीर झाली नाही.

महाराष्ट्रातला संपूर्ण जागावाटपाचा निर्णय अजून व्हायचा आहे. सगळ्याच 48 जागांचा निर्णय होईल. काहीतरी राजकारणासाठी बोलायचं आणि राजकीय फायदा घ्यायचा असं होत नाही, असे आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Edited By : Atul Mehere

R

Chandrashekhar Bawankule, Navneet Rana & Bacchu Kadu
Chandrashekhar Bawankule: 'बारामतीत सर्वात मोठा विजय होईल' | Baramati Loksabha |

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com