MP Pratibha Dhanorkar : भाजपच्या लोकांनी माझ्यासाठी काम केलं, धानोरकरांचे खळबळजनक वक्तव्य !

Chandrpur Loksabha Election 2024 : सत्तेची माज भाजपच्या लोकांना आला होता. तो माज उतरविण्याचे काम तुम्ही सर्वांनी या निवडणुकीच्या माध्यमातून केले. भाजपला आलेली सत्तेची गुर्मी मतदारांनी मतदान करून उतरविली.
Pratibha Dhanorkar
Pratibha DhanorkarSarkarnama
Published on
Updated on

Chandrpur News : वणी-चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव करणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या विजयात भाजपचा देखील वाटा असल्याचे विधान करत जोरदार खळबळ उडवून दिली आहे. लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांची विजय रॅली काढण्यात आली. त्यामध्ये धानोरकर यांनी हे वक्तव्य केले आहे.

महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी भाजप नेते मुनगंटीवार यांचा दारूण पराभव केला. आपल्याला मिळालेल्या विजयात काँग्रेससह भाजपचा वाटा असून पडद्यामागून भाजपच्या अनेक लोकांनी देखील आपल्याला मदत केली, असे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले आहे. यामुळे चंद्रपूरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आपल्याला मदत तर केलीच पण भाजपचाही आपल्या विजयात वाटा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचे विशेष आभार असेही त्या म्हणाल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पेक्षा अधिक मताधिक्याने आपला या निवडणुकीत विजय झाल्याचे सांगत त्यांनी मतदारांचे आभार व्यक्त केले. गेल्या दहा वर्षाच्या काळात ज्या पद्धतीने भाजपच्या लोकांनी हुकूमशाही गाजवली, चुकीचे निर्णय घेतले. सत्तेची माज भाजपच्या लोकांना आला होता. तो माज उतरविण्याचे काम तुम्ही सर्वांनी या निवडणुकीच्या माध्यमातून केले. भाजपला आलेली सत्तेची गुर्मी मतदारांनी मतदान करून उतरविली.

Pratibha Dhanorkar
Krupal Tumane : खरे व्हिलन चंद्रशेखर बावनकुळे, सर्वेच्या नावे एकनाथ शिंदेंवर दबाव, शिंदे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप

भाजपमध्ये देखील अनेक असे नेते, निष्ठावंत पदाधिकारी होते. जे या सरकारच्या कारभारावर समाधानी नव्हते. त्यांनाही कुठे तरी वाटत होते की, हे सरकार पडले पाहिजे. या निवडणुकीत मतदारांनी जो विश्वास आपल्यावर दाखवून निवडणुकीत एवढ्या मोठ्या मताधिक्याने विजयी केले आहे. त्याचे ऋण कधीही विसरू शकत नाही, असे धानोरकर म्हणाल्या. पडद्यामागून भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी यासाठी आपल्याला मदत केल्याने त्यांचेही जाहीर आभार मानले पाहिजे, असे धानोरकर म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com