Krupal Tumane : रामटेकची जागा चंद्रशेखर बावनुकळे यांच्यामुळेच गमावावी लागली असल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाचे नेते माजी खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे. सर्वेच्या नावावर एकनाथ शिंदेंवर दबाव आणला. खरे व्हिलन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे आहे. त्यांनी राजीनामा द्यायला हवा, असा घणाघात तुमाने यांनी केला.
रामटेकमधू दोन वेळा जिंकलेले कृपाल तुमाने यांना शिंदे गटाने तिकीट नाकारत काँग्रेसमधून Congress आमदार राजू पारवेंना आयात करत उमेदवारी दिली. भाजपनेच पारवे यांना उमेदवारी देण्यासाठी पुढाकार घेतला. सर्वेचे नाव पुढे करत मुख्यमंत्री शिंदेवर दबाव टाकला. तुमाने यांना उमेदवारी दिली तर त्यांना जिंकून आणण्याची जबाबदारी नसल्याचे देखील बावनकुळेंनी मुख्यमंत्र्यांना म्हटले त्यासाठी सर्वेचा हवाला दिला की तुमाने पराभूत होत आहे, असा धक्कादायक दावा कृपाल तुमाने यांनी केला.
चंद्रशेखर बावनुकळे यांचा मतदारसंघ असलेल्या कामठी मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना लीड मिळाले. त्यामुळे ज्यांच्या मतदारसंघात लीड मिळाली नाही त्यांच्यावर कारवाई करणार, असे बावनकुळे म्हणत होते. त्यांच्या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराला लीड मिळाले आहे. आता त्यांच्यावर काय कारवाई होणार, असा थेट सवाल तुमाने यांनी विचारला आहे.
सर्वेमध्ये मला 76 टक्के लोकांनी पसंती दिली होती. तर, राजू पारवेंना केवळ 1 टक्के लोकांनी पसंती दिली होती. मात्र, चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमित शाह यांच्याकडून दबाव आणत पारवे यांना तिकीट मिळवून दिल्याचा गौप्यस्फोट देखील तुमाने यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.