Ajit Pawar : "...तर राजकारण सोडेल"; अजितदादांच्या निकटवर्तीय नेत्याचं मोठं विधान

Prafull Patel On Ncp Worker : विचारसरणी बदला, भरभरून केलेल्या कामांची जाणीव ठेवा. हिंमतीनं लोकांपर्यंत जाऊन विकासकामे सांगा, असं आवाहन पटेल यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
ajit pawar (1).jpg
ajit pawar (1).jpgsarkarnama
Published on
Updated on

देशाचे संविधान संपविण्याची कुणाचीही ताकद नाही. आरक्षणालाही धक्का लागणार नाही. असं काही घडल्यास राजकारण सोडणार, असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजितदादा पवार ) नेते, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे.

लोकसभेला '400 पार' खासदार निवडून आले, तर संविधान बदलले जाणार, असा आरोप सातत्यानं विरोधकांकडून करण्यात आला. त्याचा फटका भाजप आणि 'एनडीए'ला बसला. भाजपला 240 आणि 'एनडीए'ला 294 जागा मिळाल्या. 'संविधान बदलणार,' 'आरक्षण संपविणार,' असा खोटा प्रचार विरोधकांनी केला, अशी टीका सत्ताधारी पक्षाकडून करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेलांनी ( Prafull Patel ) हे वक्तव्य केलं आहे.

ते गोंदिया जिल्ह्याच्या सडक-अर्जुनीतील वात्सल्य सभागृहात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

पटेल म्हणाले, "लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी महायुती ( Mahayuti ) सरकार संविधान बदलणार असल्याचा अपप्रचार केला. लोकांची दिशाभूल करण्याचं काम त्यांनी केले. देशाचे संविधान संपविण्याची कुणाचीही ताकद नाही. आरक्षणालाही धक्का लागणार नाही. असे काही घडल्यास राजकारण सोडेल."

ajit pawar (1).jpg
Babajani Durrani : बाबाजानी दुर्राणींनी 'तुतारी' हाती घेताच अजितदादांच्या पक्षाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, त्यांना...

"गोदिंया जिल्ह्यातील 93 हजार महिलांना 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचा लाभ मिळणार आहे. आम्ही हे केले, ते केले हे आम्हालाच सांगावे लागते ही बाब चुकीची आहे. या कामांना विसरून चालता येणार नाही. विचारसरणी बदला, भरभरून केलेल्या कामांची जाणीव ठेवा. हिंमतीनं लोकांपर्यंत जाऊन विकासकामे सांगा," असा सल्ला पटेलांनी कार्यकर्त्यांना दिला.

ajit pawar (1).jpg
Sharad Pawar Vs Ajit Pawar : अजितदादांची साथ सोडणाऱ्यांना माफ करणार नाही; राष्ट्रवादीचा इशारा

"केंद्र आणि राज्य सरकारनं जनतेच्या हितासाठी अनेक योजना आणल्या. मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली. शेतमालाला बोनस देण्याची प्रथा 2009-10 मध्ये आणली. शेतकऱ्यांना पंतप्रधानमंत्री सन्माननिधी मिळतो. आता मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे," असं पटेलांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com