Chhatrapati Shivaji Maharaj news : आता शासकीय पत्रांवर आणि कार्यालयांत असणार शिवराज्याभिषेक सोहळ्याचे बोधचिन्ह !

Sudhir Mungantiwar : २४ जुलैला राज्य सरकारचा हा निर्णय जाहीर केला.
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama

Cultural activities department is conducting special activities : ‘हॅलो नव्हे, तर वंदे मातरम् म्हणा...’ त्यानंतर ‘जय जय महाराष्ट्र माझा...’ हे राज्यगीत आणि आता प्रत्येक शासकीय पत्रावर आणि शासकीय कार्यालयांच्या दर्शनी भागात शिवराज्यभिषेक सोहळ्याचे बोधचिन्ह लावण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. (Placing of signs has been made mandatory)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय पराक्रम, शौर्य आणि अतुलनीय कार्याच्या गौरवार्थ आणि स्मरणार्थ राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी २४ जुलैला राज्य सरकारचा हा निर्णय जाहीर केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात सांस्कृतिक कार्य विभाग वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्य़पूर्ण उपक्रम राबवत आहे.

आता शिवरायांचे शौर्य व पराक्रम अधोरेखित करणारे बोधचिन्ह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत पोहोचविण्याच्या कल्पक प्रयत्नांना यश आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर पुन्हा एकदा मनामनांत व्हावा, जगभरातील प्रत्येक मराठी माणसापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती आणि पराक्रम पोहोचावा, या उद्देशातून हा निर्णय घेण्यात आल्याचे शासन निर्णयात नमूद केले आहे.

विशेष म्हणजे प्रत्येक शासकीय कार्यालयाला दर्शनी भागात बोधचिन्ह लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त सांस्कृतिक विभागाने आयोजित केलेला प्रत्येक उपक्रम नावीन्यपूर्ण ठरला. गेट वे ऑफ इंडियाला घेतलेले शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन असो वा रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा. राज्यातील (Maharashtra) जनतेने त्या आठवणी मनांत जपून ठेवलेल्या आहेत.

Sudhir Mungantiwar
Mungantiwar On Danve : 'तुम्ही फॉर्म चुकीचा भरला, त्याला मी काय करू?' मुनगंटीवारांनी घेतली दानवेंची फिरकी !

शासकीय कार्यालयांमध्ये एकमेकांना भेटल्यानंतर वा दूरध्वनीवरील संभाषण सुरू करताना हॅलो ऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणण्याचा सांस्कृतिक कार्य विभागाचा निर्णय पाळला जात आहे. आता शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या बोधचिन्हाच्या बाबतीत झालेला निर्णय ऐतिहासिक ठरणार आहे.

महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) काळातील नाणी, गडकिल्ले, अष्टप्रधान मंडळ आदी प्रत्येक गोष्ट प्रेरणादायी आहे. या प्रेरक गोष्टी जनसामान्यापर्यंत सहजपणे पोहोचविण्याचा सांस्कृतिक विभागाचा प्रयत्न आहे. त्यात आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे बोधचिन्ह सर्वदूर पोहोचविण्याच्या निर्णयाची भर पडली आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com