Chicholi Nagarpanchayat : बावनकुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांकडे नेला विषय, अन् चिचोलीसाठी मिळाला हिरवा कंदील !

Chandrashekhar Bawankule : या विषयात आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी यशस्वी मध्यस्थी केली.
Eknath Shinde, Chandrashekhar Bawankule and Kishor Choudhari.
Eknath Shinde, Chandrashekhar Bawankule and Kishor Choudhari.Sarkarnama

Chicholi Gram Panchayat will now become Nagar Panchayat : चिचोली (खापरखेडा) ग्रामपंचायतीला मागील अनेक वर्षांपासून पात्र असतानासुद्धा नगर पंचायतीचा दर्जा देण्यात आला नाही. त्यामुळे विविध राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी नगर पंचायत दर्जाच्या मागणीसाठी एलगार पुकारला. या विषयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी यशस्वी मध्यस्थी केली आणि मुख्यमंत्र्यांनी चिचोली नगरपंचायत करण्याला हिरवा कंदील दिला. (The Chief Minister gave the green light to make Chicholi Nagar Panchayat)

यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देण्यात आले होते. आमदार बावनकुळे यांच्या मध्यस्थीमुळे नगर पंचायतीचा मुद्दा थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात पोहोचला. सर्वपक्षीय शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यशस्वी चर्चा झाली. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी चिचोली (खापरखेडा) नगर पंचायतीला हिरवा कंदील दिला असून प्रधान सचिवांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत अधिसूचना निघण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

चिचोली (खापरखेडा) हा परिसर औद्योगिक परिसर म्हणून ओळखला जातो. २०११ साली झालेल्या जनगणनेनुसार या परिसराची लोकसंख्या १८ हजार ४६९ इतकी होती. आज जवळपास चार पटीने लोकसंख्या वाढली आहे. मात्र चिचोली (खापरखेडा) ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा देण्यात आला नाही. उलट चिचोली (खापरखेडा) ग्रामपंचायतीपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना नगर पंचायत दर्जा देण्यात आला.

चिचोली (खापरखेडा) ग्रामपंचायत शासनाने ठरवून दिलेल्या अटीशर्तीस पात्र असतानासुद्धा डावलले जात असल्यामुळे ग्रामवासीयांवर फार मोठा अन्याय झाला. त्यामुळे सर्वपक्षीय स्थानिक राजकीय नेत्यांनी या अन्यायाविरोधात लढा देण्यासाठी एलगार पुकारला. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शांताराम गावंडे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळाने महाराष्ट्र दिनी १ मे रोजी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिले. यावेळी बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घालून देण्याचे आश्वासन दिले. शिवाय नगरपंचायतीचा दर्जा मिळवून देण्याचा मुद्दा मार्गी लावून देण्याचे आश्वासन दिले होते.

Eknath Shinde, Chandrashekhar Bawankule and Kishor Choudhari.
Chandrashekhar Bawankule : कुणीही आला तर आमचा झेंडा आणि दुपट्टा तयार आहे !

यासंदर्भात सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेते किशोर चौधरी व भाजप (BJP) ओबीसी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष विलास महल्ले यांनी तडकाफडकी मुंबई मंत्रालय गाठले. यावेळी आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी भेट घालून दिली. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांशी (Chief Minister) यशस्वी चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रधान सचिव न.वि. दोन यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यामुळे चिचोली (खापरखेडा) नगर पंचायतीचा मुद्दा निकाली निघाला असून येणाऱ्या काही दिवसांत अधिसूचना निघण्याची शक्यता आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com