Municipal Council : दोन अधिकारी गेले, एक आले, मुख्याधिकाऱ्यांचे पद रिक्तच राहिले

Await For Chief Officer : गोंदिया नगर परिषदेला मिळालाच नाही पूर्णवेळ अधिकारी
Gondia Municipal Council
Gondia Municipal CouncilSarkarnama
Published on
Updated on

Gondia Administration : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदलीचे सत्र सुरू झाले आहे. अशात गोंदिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक करण चव्हाण यांची बदली भंडारा येथे करण्यात आली आहे. चव्हाण यांच्या बदलीनंतर अद्यापही गोंदिया नगर पालिकेमध्ये मुख्याधिकारी म्हणून नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे गोंदिया नगरपरिषद अनाथ झाली आहे. लवकर या पदावर अधिकारी मिळण्याची मागणी होत आहे.

गोंदियाच्या निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांचीही बदली भंडारा येथे करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महसूल विभागात कार्यरत उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे शासन आदेश काढण्यात आलेत. यात गोंदियाच्या निवासी उपजिल्हाधिकारी बेलपत्रे यांचाही समावेश आहे.

Gondia Municipal Council
Gondia News : पोषण आहाराबाबत कर्मचारी ‘अपडेट’ झालेच नाहीत

बेलपत्रे यांची बदली भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी पदावर करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर नागपूर सुधार प्रन्यासच्या विजया बनकर यांची निवासी उपजिल्हाधिकारी गोंदिया म्हणून बदली करण्यात आली आहे. राज्याच्या सर्वच महसूल विभागात कालावधी पूर्ण झालेले किंवा स्थानिक रहिवासी असलेल्या अधिकाऱ्यांचा लोकसभा निवडणुकीपूर्वी करण्यात आलेल्या बदलीत समावेश आहे. गोंदिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी करण चव्हाण हे भंडारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. चव्हाण यांच्या बदलीनंतर गोंदिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून कुणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. पालिकेवर प्रशासकराज असताना अधिकाऱ्याची नियुक्ती न करणे एक प्रकारे विकास कामांना बांधित करण्याचे काम असल्याचे बोलले जात आहे.

गोंदिया जिल्ह्यात येण्यास अजूनही अधिकारी वर्ग धजावत नाही. त्यांना आजही गोंदिया जिल्हा शिक्षेचा जिल्हा वाटतो. त्यामुळे गोंदिया जिल्ह्याकडे येण्यास अधिकारी वर्ग टाळाटाळ करतात. त्याचाच हा एक प्रकार असावा ज्यामुळे गोंदिया नगर परिषदेचे पद रिक्त झाले असावे, अशी चर्चा आता केली जात आहे. दुसरीकडे नक्षलवादी जिल्हा म्हणूनही गोंदिया जिल्ह्याकडे पाहिले जाते. या भीतीपोटी सुद्धा गोंदिया जिल्ह्यात येण्यास अधिकारी घाबरतात. जिल्ह्याला यामुळेच रिक्त पदांचे ग्रहणही लागले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रशासक असलेले मुख्याधिकारी पद रिक्त ठेवणे गोंदिया सारख्या शहराला कधीच परवडणारे नाही. त्यामुळे राज्य सरकारने गोंदिया जिल्ह्याबाबत असलेला शिक्षेचा कलंक आता पुसणे गरजेचे आहे, अन्यथा गोंदिया जिल्ह्याला अधिकारी मिळेनासे होऊ शकते. सुरुवातीच्या काळात विदर्भात येण्यासाठी अधिकारी धजावत नव्हते. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर किमान चंद्रपूरपर्यंत अधिकारी नियुक्ती स्वीकारतात. मात्र भंडारा, गोंदिया, गडचिराली जिल्ह्यात नियुक्ती आजही अधिकाऱ्यांना नकोशी आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Gondia Municipal Council
Gondia's Former Minister : गोंदिया जिल्ह्यातील भाजपच्या माजी मंत्रिमहोदयांना कशाची वाटतेय भीती?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com