Gondia's Former Minister : गोंदिया जिल्ह्यातील भाजपच्या माजी मंत्रिमहोदयांना कशाची वाटतेय भीती?

Audio Going Viral : २०१९ मध्ये विजेच्या मुद्द्यावरून मतदारांनी नाकारल्याची दिली कबुली !
Gondia Agitation
Gondia AgitationSarkarnama

Gondia's Former Minister : गोंदिया जिल्ह्यातील भाजपच्या एका माजी मंत्र्याने कृषी पंपाला मिळणाऱ्या विजेच्या विषयात मध्यस्थी करण्यास चक्क नकार दिला. याच विजेच्या मुद्द्यामुळे मागील विधानसभेच्या निवडणुकीत आपला पराभव झाला असल्याने लोक मतदान करीत नसल्याची भीती भाजपच्या माजी मंत्रिमहोदयांनी समस्या मांडत असलेल्या व्यक्तीसमोर फोनवर बोलताना व्यक्त केली.

याबाबत झालेल्या संभाषणाचा ऑडिओ व्हायरल झाल्याने भाजपच्या ‘त्या’ माजी मंत्र्यांना कृषी वीजपंपाला मिळणाऱ्या विजेबाबत शेतकरी आणि सरकार यांच्यात मध्यस्थी करण्यास स्वारस्य नसल्याचे समोर आलेले आहे. त्यामुळे माजी मंत्र्यांना मतदारांची भीती वाटत असल्याची चर्चा जिल्ह्यात चर्चा रंगली आहे. कृषी वीजपंपांना दिवसा 12 तास वीजपुरवठा होत नसल्याने 28 जानेवारी रोजी सकाळी 11 च्या सुमारास गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील लाखांदूर चौकात उपोषण सुरू आहे.

Gondia Agitation
Gondia Teacher News : खासगी संस्थाचालकही करेना पवित्र पोर्टलमार्फत भरती !

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) गोंदिया जिल्ह्याचे कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी उपोषणाला बसले आहेत. धान पिकाला सिंचनाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. शेतशिवारात सिंचन करण्यासाठी शेतकऱ्यांकडे कृषी वीजपंप आहेत. मात्र कृषी वीजपंपांना रात्रीच्या वेळी वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन सिंचनासाठी शेतशिवारात जावे लागते. रात्रीच्या सुमारास शेतशिवारात सिंचनासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर वन्यप्राण्यांनी हल्ला केल्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत.

शरद पवार गटाचे गोंदिया जिल्ह्याचे कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांनी अधिवेशनादरम्यान जयंत पाटील यांची भेट घेऊन शेतकऱ्यांची आपबीती सांगितली. यावरून जयंत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी लावली होती. त्यावेळी दिवसा १२ तास वीजपुरवठा देण्याची हमी राज्य सरकारने दिली होती.

घोषणेवरून जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पिकांची लागवड केली. असे असले तरी 1 जानेवारी 2024 रोजी रात्री 8 तास वीजपुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले. त्यावरून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अर्जुनी मोरगाव येथील रस्त्यावर टायर जाळून शासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला होता व दिवसा वीजपुरवठा न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुसार 28 जानेवारी रोजी आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या उपोषणाची सरकारने दखल घ्यावी, या उद्देशाने उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांपैकी एकाने भाजपच्या माजी मंत्र्यांना कॉल केला आणि याबाबत सरकारच्या लक्षात ही बाब आणून देण्याची विनंती केली. मात्र ही सरकारची भूमिका आहे. शिवाय आपण दुहेरी भूमिकेत असल्याने आणि स्वतः आमदार नसल्याने आपण जिल्ह्यातील आमदार आणि खासदारांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून द्यावी.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हा मुद्दा इतका सेन्सिटिव्ह आहे, की या विजेच्या मुद्द्यावरून आपल्याला मते मिळाली नसल्याने आपण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कसे हरलो, हे माजी मंत्र्यांनी शेतकऱ्याला समजावून सांगितले आहे. आता या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने भाजपच्या त्या माजी मंत्र्यांनी निवडणुकीत पडल्याने मतदारराजाची कशी धास्ती घेतली, याची चर्चा जिल्हाभर रंगली आहे.

Edited By : Atul Mehere

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com