Chitra Wagh News : महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच चित्रा वाघ अॅक्शन मोडवर

Chitra Wagh News : चित्रा वाघ यांनी विदर्भ दौऱ्याला मातृतीर्थ सिंदखेड राजा पासून सुरुवात केली आहे
Chitra Wagh
Chitra Waghsarkarnama

सिंदखेड राजा : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार घरी बसून काम करणारे ऑनलाइन सरकार होते, अशी टीका भाजप (BJP) महिला आघाडीच्या नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सिंदखेड राजा येथे पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळावर जाऊन नतमस्तक होऊन त्यांनी विदर्भ दौऱ्याला सुरुवात केली.

विदर्भातील ११ जिल्ह्यामध्ये त्यांचा दौरा असणार आहे. महिलांच्या स्वावलंबनासाठी बचतगटांना जोड म्हणून हे सरकार नवनवीन योजना आणणार असल्याचे सांगून चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी शेतकरी, कष्टकरी महिलांच्या उन्नतीसाठी देखील हे सरकार काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मागील अडीच वर्षाच्या काळात राज्याची वाताहत झाली, असा आरोप करून चित्रा वाघ यांनी केला.

Chitra Wagh
मुख्यमंत्री शिंदेंचा सत्तारांना जाहीर सभेत माफी मागण्याचा आदेश?

त्या सरकारच्या काळात अत्याचार, शेतकरी आत्महत्या, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न उभे राहिले. मात्र, शिंदे, फडणवीस सरकार येताच एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला हे अचानक झाले, नसून हा नेतृत्वाचा फरक असल्याचे त्या म्हणाल्या. महिलांवरील अत्याचाराच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी खासदार संजय राऊत यांनी सपना पाटकर यांना शिवीगाळ केली होती, असेही त्या म्हणाल्या.

मागील सरकारच्या काळात दाद मागणाऱ्या महिलांच्या गाडीत पिस्तुल ठेवल्या जाते, असा आरोप त्यांनी केला. नंदुरबार येथील महिला अत्याचाराचा देखील त्यांनी यावेळी उल्लेख करून मागील सरकारने या प्रकरणात कोणतीच कारवाई केली नाही. मात्र, आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या सर्व प्रकरणात लक्ष देऊन आरोपींवर कारवाई केली, असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या.

भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक मतदान केंद्रावर पुरुषांसोबतच महिला असणार आहेत. प्रत्येक बुध केंद्रांवर २५ महिला असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. २०२४ च्या लोकसभेमध्ये ४५ जागा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडून येतील, अशा पद्धतीचा प्रण घेऊन सगळेजण कामाला लागणार आहोत. त्याचबरोबर विधानसभेत २०० हून अधिक जागा भाजप जिंकल्या शिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी भाजप प्रवक्ते विनोद वाघ, माजी आमदार चैनसुख संचेती, विजय राज शिंदे, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Chitra Wagh
भाषण सुरु असतानाच सत्तारांच्या सभेतून लोक निघाले...

चित्रा वाघ यांच्या विदर्भ दौऱ्याला मातृतीर्थ पासून सुरुवात झाली. या वेळी स्थानिक पंचायत समितीच्या सभागृहात महिलांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी चित्रा वाघ यांनी मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारच्या काळात महिलांना सन्मानाची वागणूक मिळत असल्यांचे प्रतिपादन केले. या मेळाव्याला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com